नाशिक - पत्रकार परिषदेतुन खुलेआम शीवीगाळ करणारे शिवसेना खासदार संजय राऊत साधु संतांनी घडवलेल्या महाराष्ट्राच्या संस्कृतीला कलंक आहेत. त्यांना राज्यसभेतून निलंबित करा, अशी मागणी भाजप अध्यात्मिक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष आचार्य तुषार भोसले ( Bjp Tushar Bhosle ) यांनी केली आहे. ( Tushar Bhosle on Sanjay Raut ) यासंदर्भातील पत्र त्यांनी उपराष्ट्रपतींकडे केली आहे. ( Tushar Bhosle wrote letter to VP Venkaiya Naidu )
काय म्हणाले तुषार भोसले?
वेळोवेळी खालच्या दर्जाची भाषा वापरणार्या संजय राऊतांना राज्यसभा सदस्य या संवैधानिक पदावर राहण्याचा अजिबात नैतिक अधिकार नाही. त्यामुळे उपराष्ट्रपती वेंकैया नायडू यांनी शिवराळ खासदार संजय राऊत यांना तत्काळ राज्यसभेतून निलंबित करावे, अशी मागणी करत पत्र लिहिले आहे.
हेही वाचा - Narayan Rane Critics on Sanjay Raut : संजय राऊत यांना घाम का फुटत होता - नारायण राणे
काय म्हणाले होते संजय राऊत?
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची अलिबागमध्ये बेनामी ( CM Uddhav Thackeray property in Alibaug ) संतप्त असल्याचा दावा करणाऱ्या भाजपचे नेते किरीट सोमैय्या यांच्यावर खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत कडाडून ( Shivsena leader Sanjay Raut Press conference ) हल्ला केला. संजय राऊत म्हणाले, की 19 बंगले अलिबाग बांधून ठेवल्याचा दावा करणाऱ्या दलालाला आवाहन आहे. त्यांनी बंगले दाखवून द्यावेत. सगळ्यांना सांगतो, चार बसेस करू. सर्व पत्रकार पिकनिक काढू. बंगले दिसले तर राजकारण सोडू, असे खासदार संजय राऊत यांनी म्हटले. अलिबागमध्ये बंगले दिसले नाही तर त्या दलालाला जोडे मारीन. शिवसेना जोड्याने मारेन रोज टीव्हीवर दिसत आहेत बंगले... कुठे आहेत बंगले? लोकांच्या मनात खोटेपणा दाखवू नका. दलालाला मराठीचा ( Kirti Somaiya hate marathi ) द्वेष आहे. शालेय शिक्षणात मराठी सक्तीची नसावी, त्यासाठी दलाल न्यायालयात गेला होता. हा भाजपचा दलाल आणि XXX आहे. आधी याचे थोबाड बंद करा, असे संतप्तपणे संजय राऊत यांनी ( Sanjay Raut Slammed Kirit Somaiya ) म्हटले आहे.