नाशिक - या देशात तुकडे-तुकडे गॅंग फक्त आरोप करतात. शिवसेनेला हे मान्य आहे का? ड्रग्स माफिया विरुद्ध मोहीम चालवायची की नाही. अधिकारी हिंदु की मुस्लिम यात काय अर्थ आहे. शिवसेनेला ड्रग्सविरोधी मोहीम हवी का नको? हे त्यांनी स्पष्ट करावे, असे आव्हान भाजपचे प्रदेश प्रवक्ते केशव उपाध्याय यांनी दिले. उपाध्ये यांनी वंसतस्मृती कार्यालयात पत्रकार परिषद घेत ड्रग्जविरोधी कारवाईवरुन शिवसेना व महाविकास आघाडीवर टीका केली.
अधिकाऱ्यावर आक्षेप असेल तर कोर्टात जा -
मंत्री नवाब मलिक यांच्यावर पलटवार करत उपाध्ये म्हणाले की, त्यांना अधिकाऱ्यावर आक्षेप असेल तर त्यांनी न्यायालयात जावे. नुसते आरोप का करताय? ट्विटरवर का खेळताय? असा टोलाही लगावला. माजी गृहमंत्री फरार आहे. ही महाराष्ट्राची बदनामी असून अनिल देशमुखांसाठी शरद पवार यांनी दोन पत्रकार परिषदा घेतल्या. मात्र, ते फरार कुठे? याबाबत नाही अशी टीकाही त्यांनी केली.
हेही वाचा - शाहरुख खानची मॅनेजर पूजा ददलानीचा सीडीआर काढण्यासाठी पाच लाखांची ऑफर; क्रूझ ड्रग्स प्रकरणी हॅकरचा दावा
जलयुक्त शिवारला बदनाम केले
हे सरकार विश्वासघाताने सत्तेवर आले. लोकसहभागातून राबविलेल्या जलयुक्त शिवार योजनेची यशस्वीता मोठी होती. राज्यात १३ लाख कामे झाली. यातील ५०० ते ७०० कामात काही त्रुटी झाल्या. राज्य सरकारने नेमलेल्या समितीचा आज अहवालात क्लिन चिट दिली. या योजनेमुळे, शेतकऱ्यांना फायदा झाला हे स्पष्ट झाले. चांगल्या योजनेला आघाडी सरकारने बदनाम केले, या शब्दात त्यांनी सरकारवर टीका केली.