ETV Bharat / state

विदर्भातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा.. धान खरेदीला ३१ मे पर्यंत मुदतवाढ - धान खरेदी नाशिक

विदर्भात यंदाच्या वर्षी धानाचे मोठ्या प्रमाणात उत्पन्न झाले आहे. विदर्भातील धान खरेदी करण्यासाठी ३१ मार्चपर्यंत असलेली मुदत वाढवून ही मुदत ३१ मे पर्यंत वाढवण्यात आली असल्याची माहिती मंत्री छगन भुजबळ यांनी दिली आहे.

chhagan bhujabal
अन्न,नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ
author img

By

Published : Mar 24, 2020, 9:20 PM IST

नाशिक - विदर्भातील धान खरेदी करण्यासाठी ३१ मार्चपर्यंत असलेली मुदत वाढवून ही मुदत ३१ मे पर्यंत वाढवून देण्यास केंद्रीय अन्न व नागरी पुरवठा मंत्री रामविलास पासवान यांच्याकडून मंजुरी मिळाली असल्याची माहिती राज्याचे अन्न, नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी दिली आहे. त्यामुळे विदर्भातील धान उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

विदर्भातील धान उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा

हेही वाचा - मध्यरात्रीपासून गोव्यात संचारबंदी, सर्व मंत्र्यांचा १ महिन्याचा पगार राज्य सरकारसाठी मदतनिधी

विदर्भात यंदाच्या वर्षी धानाचे मोठ्या प्रमाणात उत्पन्न झाले. त्याचप्रमाणे राज्य सरकारने धानासाठी १८०० रुपये हमीभाव आणि त्यावर ७०० रुपये बोनस दिला. शासकीय खरेदी केंद्रावर चांगला भाव मिळाल्याने शेतकऱ्यांनी खासगी व्यापाऱ्यांकडे पाठ फिरवली होती. शेतकरी मोठ्या प्रमाणात धान शासनाच्या खरेदी केंद्रावर घेऊन येत होते. मात्र, कोरोनामुळे त्यांची गैरसोय झाली होती.

शासनाकडून सुरू असलेली धान खरेदी ३१ मार्चपर्यंत सुरू राहणार होती. मात्र, अद्याप शेतकऱ्यांकडे मोठ्या प्रमाणात धान उपलब्ध असल्याने तसेच कोरोनाचा प्रादुर्भावामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीत ही मुदत अधिक वाढवून मिळावी यासाठी राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी केंद्राकडून धान खरेदीसाठी मुदतवाढ देण्यात यावी यासाठी माजी केंद्रीय कृषी मंत्री खासदार शरद पवार यांच्या मध्यस्थीने केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांच्याकडे मागणी केली होती.

त्यानुसार केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांनी राज्याचे अन्न, नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क करत विदर्भातील धान खरेदीसाठी ३१ मार्चपर्यंत असलेली मुदत दोन महिन्यांनी वाढवून देत ती ३१ मेपर्यंत सुरू ठेवण्यास मुदतवाढ देण्यात येत असल्याची माहिती दिली आहे. त्यामुळे विदर्भातील धान उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. त्यामुळे छगन भुजबळ यांनी खासदार पवार साहेब व केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांचे आभार मानले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.