नाशिक - नांदगाव येथे आढावा बैठकीत भुजबळ व कांदे यांच्यात झालेल्या शाब्दिक चकमक की संदर्भात भुजबळ यांनी येवला येथे आले असता त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. येवला मतदारसंघात भुजबळांचे जल्लोषी स्वागत करण्यात आले. महाराष्ट्र सदन प्रकरणी न्यायालयाने निर्दोष मुक्त केल्यानंतर भुजबळ प्रथमच मतदारसंघात आले होते.
यावेळी नांदगाव येथे झालेल्या आढावा बैठकीमध्ये पालकमंत्री छगन भुजबळ व शिवसेनेचे आमदार सुहास कांदे यांच्यात आपत्कालीन निधीच्या मुद्द्यावरून खडाजंगी झाले. अचानक घडलेल्या घटनेमुळे आढावा बैठकीत गोंधळ उडाला होता. या शाब्दिक चकमकी यासंदर्भात भुजबळांनी येथे प्रतिक्रिया दिली.
हे ही वाचा - साकीनाका बलात्कार प्रकरण : एका महिन्यात दोषारोपपत्र दाखल करा - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
काय म्हणाले भुजबळ -
येवल्यात छगन भुजबळ म्हणाले की, नांदगाव येथे झालेल्या आढावा बैठकीत शिवसेनेचे आमदार सुहास कांदे यांनी व त्यांच्याबरोब असणाऱ्या 10 ते 12 समर्थकांनी आपातकालीन निधी तात्काळ देण्याची मागणी केली. मात्र आपातकालीन निधी असा काही प्रकार नसतो. राजकारणात ते नवीन असल्याने त्य़ांना सरकार व प्रशासन कसे चालते याची कमी समज आहे. मंजूर धोरणानुसार निधी वितरीत करावा लागतो किंवा कॅबिनेट मीटिंगमध्ये यासाठी धोरण ठरवावे लागते.