ETV Bharat / state

भारत बंद : मनमाड नांदगावमध्ये कडकडीत बंद; भव्य रॅली करून निषेध - nrc

एनआरसी, सीएए आणि देशातील ढासळलेल्या अर्थव्यवस्थेविरोधात भारत मुक्ती मोर्चा (बामसेफ) संविधान बचाव समितीने बुधवार भारत बंदची हाक दिली आहे. त्याला नाशिक जिल्ह्यात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून नांदगांव आणि मनमाडला कडकडीत बंद पाळण्यात आला.

नाशकात हजारो नागरिक रस्त्यावर
नाशकात हजारो नागरिक रस्त्यावर
author img

By

Published : Jan 29, 2020, 3:23 PM IST

नाशिक - राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी (एनआरसी), नागरिकत्व सुधारणा कायदा (सीएए) आणि देशातील ढासळलेल्या अर्थव्यवस्थेविरोधात भारत मुक्ती मोर्चा (बामसेफ) संविधान बचाव समितीने बुधवार भारत बंदची हाक दिली आहे. त्याला नाशिक जिल्ह्यात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून नांदगांव आणि मनमाडला कडकडीत बंद पाळण्यात आला. यावेळी बामसेफ आणि सर्वधर्मीय यांच्या तर्फे भव्य निषेध रॅली काढून केंद्र सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.

हजारो नागरिक रस्त्यावर

देशात एनआरसी आणि सीएए विरोधात प्रचंड रोष आहे. सरकार दडपशाही करून हा कायदा लागू करू पाहत आहे. दुसरीकडे देशाची अर्थव्यवस्था तळाला गेली आहे. तर, जीएसटी, नोटबंदी आणि अविश्वासाचे वातावरण यामुळे सरकारला निधी येत नाही. देशाची दिवाळखोरीकडे वाटचाल सुरू आहे. या सर्वाला सरकार जबाबदार असून त्याचा निषेध करण्यासाठीच भारत बंद करण्यात आला आहे. बामसेफ प्रमुख यांनी डीएनए च्या धर्तीवर एनआरसी लागू करण्याची मागणी केली असून देशभरात आज मोठ्या प्रमाणात आंदोलन करण्यात आले.

यावेळी 'देश की जनता भूखी है, ये आझादी झूठी है', सारख्या घोषणा देण्यात आल्या. तर, 'जान से प्यारी आझादी' हे गाणे म्हणत तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला. फुले चौक येथून महात्मा फुले यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून मोर्चाला सुरवात करण्यात आली. नेहरू भवन, सराफा बाजार, शिवाजी चौक, आंबेडकर पुतळामार्गे एकात्मता चौकात रॅलीचा समारोप करण्यात आला. यावेळी सर्वांनी आम्ही सर्व भारतीय आहोत कोणी आमच्याकडे पुरावे मागू नये असे आवाहन केले.

हेही वाचा - नाशिक बस दुर्घटना : 26 जणांचा मृत्यू.. शेतकरी धावले होते मदतीला

आज भारत बंदच्या पार्श्वभूमीवर नांदगाव शहर आणि मनमाडममध्ये कडेकोट बंद पाळण्यात आला. राज्य व्यापारी संघटनेने बंदमधे सहभागी न होण्याचे आवाहन केले होते, तरीही त्याला न जुमानता कडकडीत बंद करण्यात आला.

हेही वाचा - नाशिकमध्ये एसटी-रिक्षाचा विचित्र अपघात! दोन्ही वाहने विहिरीत कोसळल्याने 25 ठार

Intro:मनमाड: राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी (एनआरसी), नागरिकत्व सुधारणा कायदा (सीएए) आणि देशात ढासळलेल्या अर्थव्यवस्थेविरोधात भारत मुक्ती मोर्चा (बामसेफ) संविधान बचाव समिती
बुधवार दि. २९ जानेवारी रोजी भारत बंदची हाक दिली आहे. त्याला आज नाशिक जिल्ह्यात उस्फूर्त प्रतिसाद मिळाला नांदगांव आणि मनमाडला कडकडीत बंद पाळण्यात आला.बामसेफ आणि सर्वधर्मीय यांच्या तर्फे भव्य निषेध रॅली काढून केंद्र सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.Body:देशात एनआरसी आणि सीएए विरोधात प्रचंड रोष आहे. सरकार दडपशाही करून हा कायदा लागू करू पाहत आहे. दुसरीकडे देशाची अर्थव्यवस्था तळाला गेली आहे. जीएसटी, नोटबंदी आणि गैर विश्वासाचे वातावरण यामुळे सरकारला निधी येत नाही. देशाची दिवाळखोरीकडे वाटचाल सुरू आहे. या सर्वाला सरकार जबाबदार असून त्याचा निषेध करण्यासाठीच भारत बंद करण्यात आला आहे.बामसेफ प्रमुख यांनी डीएनए च्या धर्तीवर nrc लागू करण्याची मागणी केली असुन देशभरात आज मोठ्या प्रमाणात आंदोलन करण्यात आले. यावेळी देश जनता भुकी है ये आझादी झुटी हैं, निम का पत्ता कडवा हैं मोदी भडवा है,अमित शाह कोण है तडीपार तडीपार यासारख्या घोषणा देण्यात आल्या तर जाण से प्यारी आझादी हे गाणे म्हणत तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला. फुले चौक येथून महात्मा फुले यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून मोर्चाला सुरवात करण्यात आली.नेहरू भवन सराफ बाजार शिवाजी चौक आंबेडकर पुतळा मार्गे एकात्मता चौकात रॅली येथे समारोप करण्यात आला.यावेळी सभा होऊन सर्व धर्माचे धर्मगुरू यांचे भाषणे झाली. सर्वानी यावेळी आम्ही सर्व भारतीय आहोत कोणी आमच्याकडे पुरावे मागू नये असे आवाहन केले.Conclusion:मनमाड शहरात आज भारत बंद अभूतपूर्व वातावरनातं कडेकोट बंद पाळण्यात आला नांदगांव शहर आणि मनमाड शहर कडकडीत बंद करण्यात आला राज्य व्यापारी संघटनेने बंद मधे शामिल न होण्याचे आवाहन केले होते तरीही त्याला न जुमानता कडकडीत बंद करण्यात आला.
आमिन शेख मनमाड
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.