ETV Bharat / state

नाशकात पोलिसाची गुंडगिरी,  फुकटात दारूची बाटली दिली नाही म्हणून बारमालकाला मारहाण

नाशिक येथील लेखानगर भागात एका पोलीस कर्मचाऱ्याने दारुचे बिल मागितल्याच्या कारणावरून बार मालकाला मारहाण केली. या मारहाणीचा सर्व प्रकार येथील सीसीटीव्हीत कैद झाला असून बारमालकाने अंबड पोलिसात तक्रार दाखल केली आहे.

नाशकात पोलिसाची गुंडगिरी
नाशकात पोलिसाची गुंडगिरी
author img

By

Published : Feb 4, 2020, 9:52 AM IST

नाशिक - येथे पोलिसांकडूनच गुंडगिरी होत असल्याचा वाईट अनुभव नाशिककरांना येतोय. नाशिकच्या लेखानगर भागात पोलीस कर्मचाऱ्याने एका बार मालकाला बिल मागितल्याच्या कारणावरून मारहाण केली. विशेष म्हणजे या पोलिसाने याच भागातील सराईत गुन्हेगाराच्या मदतीने ही मारहाण केल्याने संताप व्यक्त केला जात आहे. दरम्यान हा सर्व प्रकार हॉटेलच्या सीसीटीव्हीमध्ये कैद झाल्याने नाशिकच्या अंबड पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नाशकात पोलिसाची गुंडगिरी

नाशिक शहरातील गुन्हेगारीच्या अनेक घटना समोर येत असताना पोलीस प्रशासनाकडून योग्य कारवाई होत नसल्यामुळे नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण आहे. पोलीस जनतेच्या सेवेसाठी असताना पोलिसांतील दादागिरीचा प्रकार घडला आहे. लेखानगर येथे बिअरबार मध्ये बिल देण्यावरून पोलिसाने सराईत गुन्हेगाराच्या मदतीने बार चालकाला मारहाण केली. हा सर्व प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झाल्यानंतर अंबड पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा - कुसुमाग्रज प्रतिष्ठानचे 'कुसुमाग्रज स्मरण गोदावरी गौरव २०२० पुरस्कार' जाहीर

लेखानगर येथील 'हॉटेल स्पॅक्स'मध्ये पोलीस कर्मचारी भगवान एकनाथ जाधव हा त्याच्या साथीदारांसोबत बिअर घेण्यासाठी गेला होता. बिअर घेतल्यानंतर बारचालक भास्कर येतप्पा शेट्टी याने जाधवकडे पैशाची मागणी केली. मात्र, आपण पोलीस असून तुझ्याकडे बघून घेतो असे म्हणत शिवीगाळ केली. इतकंच नाहीतर पोलीस जाधव आणि त्याचा साथीदार पप्पू कांबळे याने शेट्टी यास मारहाण देखील केली. या सर्व घटनेचे दृश्य सीसीटीव्हीत कैद झाले आहे. घटनेनंतर बारचालक शेट्टी याने अंबड पोलिसांत धाव घेत तक्रार दाखल केली असून याबाबत अधिक तपास अंबड पोलीस करीत आहेत. मात्र, ज्या पोलिसांवर सर्वसामान्यांच्या रक्षणाची जबाबदारी असते तेच पोलीस जर जीवावर उठत असतील तर सामान्यांनी दाद मागायची कुणाकडे, असा प्रश्न या घटनेनंतर उपस्थित केला जातोय.

हेही वाचा - 'ईटीव्ही भारत' इम्पॅक्ट : दिंडोरी तालुक्यातील रस्ता दुरुस्तीच्या कामाला गती

Intro:नाशिक मध्ये पोलिसांकडूनच गुंडगिरी होत असल्याचा वाईट अनुभव नाशिकरांना येतोय.नाशिकच्या लेखा नगर भागात एक बार मालकाला पोलीस कर्मचार्याने बिल मागीतल्याच्या कारणाहून मारहाण केलीय.विशेष म्हणजे या पोलिसाने याच भागातील सराईत गुन्हेगाराच्या मदतीनं ही मारहाण केल्याने संताप व्यक्त केला जातोय.दरम्यान हा सर्व प्रकार हॉटेलच्या CCTV मध्ये कैद झाल्याने नाशिकच्या अंबड पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.Body:नाशिक शहरातील गुन्हेगारीच्या अनेक घटना समोर येत असताना पोलीस प्रशासनाकडून योग्य कारवाई होत नसल्यामुळे नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण आहे. पोलीस जनतेच्या सेवेसाठी असताना पोलिसांतील दादागिरीचा प्रकार घडला आहे. लेखानगर येथे बिअर बार मध्ये बिल देण्यावरून पोलिसाने सराईत गुन्हेगाराच्या मदतीने बार चालकाला मारहाण केली. हा सर्व प्रकार CCTV मध्ये कैद झाल्या नंतर अंबड पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.लेखा नगर येथील हॉटेल स्पॅक्स मध्ये पोलीस कर्मचारी भगवान एकनाथ जाधव हा त्याच्या साथीदारांसोबत बिअर घेण्यासाठी गेला होता. बिअर घेतल्यानंतर बारचालक भास्कर येतप्पा शेट्टी याने जाधव कडे पैशाची मागणी केली. मात्र मी पोलीस असून तुझ्याकडे बघून घेतो असे म्हणत शिवीगाळ केली.इतकंच नाहीतर पोलीस एकनाथ जाधव व त्याचा साथीदार पप्पू कांबळे याने शेट्टी यास मारहाण देखील केली. घटनेनंतर बारचालक शेट्टी याने अंबड पोलिसांत धाव घेत तक्रार दाखल केलीय. याबाबत अधिक तपास अंबड पोलीस करीत आहेत.

बाईट .:- हॉटेल कर्मचारीConclusion:बिलाच्या वादावरून पोलीस कर्मचारी भगवान जाधव याने बार चालकाला मारहाण केली या सर्व घटनेचे दृश्य ससीटीव्हीत कैद झाले आहे. याच CCTV च्या आधारावर पोलीस या घटनेचा तपास करीत आहेत.मात्र ज्या पोलिसांवर सर्वसामान्यांच्या रक्षणाची जबाबदारी असते तेच पोलीस जर सर्वसामान्यांच्या जीवावर उठत असेल तर.. सामान्यांनी दाद मागायची कुणाकडे असा प्रश्न या घटनेनंतर उपस्थित केला जातोय.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.