ETV Bharat / state

राष्ट्रवादीच्या 'या' नेत्याचा पराभव होताच शिवसेनेत प्रवेश

author img

By

Published : Oct 27, 2019, 8:55 PM IST

पूर्व विधानसभा मतदारसंघातून भाजपचे माजी आमदार बाळासाहेब सानप यांचे भाजपने तिकिट कापल्यानंतर थेट राष्ट्रवादीचे घड्याळ मनगटावर बांधून निवडणूक रिंगणात उतरले होते. सानप यांना पराभव पत्कारावा लागला. यानंतर अवघ्या तीन दिवसांतच सानप यांनी घड्याळ उतरवून थेट मातोश्रीवर जाऊन मनगटावर शिवबंधन बांधले.

राष्ट्रवादीच्या नेत्याचा पराभव होताच शिवसेनेत प्रवेश

नाशिक - पूर्व विधानसभा मतदारसंघातून भाजपचे माजी आमदार बाळासाहेब सानप यांचे भाजपने तिकिट कापल्यानंतर थेट राष्ट्रवादीचे घड्याळ मनगटावर बांधून निवडणूक रिंगणात उतरले होते. सानप यांना पराभव पत्कारावा लागला. यानंतर अवघ्या तीन दिवसातच सानप यांनी घड्याळ उतरवून थेट मातोश्रीवर जाऊन मनगटावर शिवबंधन बांधले.

बाळासाहेब सानप यांचा शिवसेनेत प्रवेश

हेही वाचा - विजयोत्सव बाजूला ठेवत धनंजय मुंडे शेतकऱ्यांच्या मदतीला

निवडणूक प्रचार कालावधीत सानप यांची खासदार संजय राऊत यांनी घेतलेली भेट चर्चेचा विषय ठरली होती. या भेटीमागे कदाचित शिवसेना प्रवेशाचे गुपित असावे, असे आता बोलले जात आहे. पूर्व मतदारसंघात यंदा भाजपविरुद्ध राष्ट्रवादी अशी सरळ सरळ दुरंगी लढत होत झाली. दोन्ही तुल्यबळ उमेदवार असले तरी, या मतदारसंघात ऐनवेळी घडलेल्या राजकीय घटना, घडामोडी पाहता, त्यात भाजपचे ढिकले सरस ठरले. या मतदारसंघात अटीतटीची लढाई पाहावयास मिळाली. ढिकले यांना 86 हजार 304 मते मिळाल्याने ते विजयी झाले. तर सानप यांना 74 हजार 304 मते मिळाली.

निवडणूक जाहीर झाल्यापासून नाशिक पूर्व मतदारसंघात अनेक राजकीय घटना घडामोडी घडल्या. भाजपचे आमदार व शहराध्यक्ष असलेल्या बाळासाहेब सानप यांना पक्षाने उमेदवारी देऊ नये यासाठी सानप विरोधकांनी पक्षाच्या नेत्यांच्या भेटी घेतल्या. तर सानप समर्थकांनीही उमेदवारी मिळावी यासाठी शक्तिप्रदर्शन केले. परंतु, पक्षाने अखेरच्या दिवसापर्यंत सानप यांना उमेदवारी दिली नाही. उलटपक्ष मनसेकडून इच्छुक असलेले राहुल ढिकले यांना उमेदवारी दिली. त्यामुळे नाराज सानप यांनी राष्ट्रवादीचे घड्याळ हाती बांधून उमेदवारी अर्ज दाखल क रत निवडणूक लढविली. मात्र, त्यांच्या गळ्यात विजयाची माळ पडली नाही.

election
बाळासाहेब सानप

मनसेने माजी महापौर अशोक मुर्तडक यांना या मतदारसंघातून उमेदवारी दिली होती. त्यांनी नामांकनही भरले. परंतु, माघारीच्या दिवशी नाट्यमय घडामोडीत मुर्तडक यांनी माघार घेतली. त्यांच्या माघारीने कोणाला राजकीय लाभ होईल हे नव्याने सांगण्याची त्यावेळीदेखील गरज नव्हती. मात्र, याचवेळी कॉँग्रेस आघाडीतच बिघाडी झाली. जागावाटपात पूर्वची जागा काँग्रेसच्या वाट्याला असल्याने ही जागा कॉँग्रेसने कवाडे गटाला सोडलेली असताना राष्ट्रवादीने सानप यांना उमेदवारी देऊन बिघाडी केली. मात्र, मतदारसंघात भाजपविरुद्ध राष्ट्रवादी असे चित्र निर्माण होत असताना कवाडे गटाचे गणेश उन्हवणे यांनी माघार घ्यावी यासाठी दोन्ही पक्षांकडून प्रयत्न केले गेले. त्यात यश मिळू शकले नाही. त्यामुळे वरकरणी या मतदारसंघात तिरंगी लढतीचे चित्र असले तरी, खरी लढत सानपविरुद्ध ढिकले अशीच झाली होती.

हेही वाचा - विशेष ट्रेनच्या नावाने ग्राहकांची लूट, पुणे-बल्लारपूर रेल्वे भाडे चारपट महाग

Intro:नाशिक पुर्व विधानसभा मतदार संघातून भाजपचे माजी आमदार बाळासाहेब सानप याचे भाजपने तिकिट कापल्यानंतर थेट राष्ट्रवादीचे घड्याळ मनगटावर बांधून निवडणूक रिंगणात उतरून बंडखोरी केली परतु बाळासाहेब सानप यांना पराभव पत्कारावा लागला. यानंतर अवघ्या तीन दिवसांतच सानप यांनी मनगटाचे घड्याळ उतरवून थेट मातोश्रीवर जाऊन मनगटावर शिवबंधन बांधलेBody:त्यामुळे निवडणूक प्रचार कालावधीत सानप यांची खासदार संजय राऊत यांनी घेतलेली भेट चर्चेचा विषय ठरली होती. या भेटीमागे कदाचित शिवसेना प्रवेशाचे गुपित असावे, असे आता बोलले जात आहे.पूर्व मतदारसंघात यंदा भाजपविरुद्ध राष्ट्रवादी अशी सरळ सरळ दुरंगी लढत होत झाली. दोन्ही तुल्यबळ उमेदवार असले तरी, या मतदारसंघात ऐनवेळी घडलेल्या राजकीय घटना, घडामोडी पाहता, त्यात भाजपचे ढिकले सरस ठरले. या मतदारसंघात अटितटिची लढाई पहावयास मिळाली. ढिकले यांना ८६ हजार ३०४ मते मिळाल्याने ते विजयी झाले तर सानप यांना ७४ हजार ३०४ मते मिळाली.Conclusion:निवडणूक जाहीर झाल्यापासून पूर्व मतदारसंघात अनेक राजकीय घटना घडामोडी घडल्या. भाजपचे आमदार व शहराध्यक्ष असलेल्या बाळासाहेब सानप यांना पक्षाने उमेदवारी देऊ नये यासाठी सानप विरोधकांनी पक्षाच्या नेत्यांच्या भेटी घेतल्या, तर सानप समर्थकांनीही उमेदवारी मिळावी यासाठी शक्तिप्रदर्शन केले; परंतु पक्षाने अखेरच्या दिवसापर्यंत सानप यांना उमेदवारी दिली नाही, उलटपक्ष मनसेकडून इच्छुक असलेले राहुल ढिकले यांना उमेदवारी दिली. त्यामुळे नाराज सानप यांनी राष्ट्रवादीचे घड्याळ हाती बांधून उमेदवारी अर्ज दाखल क रत निवडणूक लढविली; मात्र त्यांच्या गळ्यात विजयाची माळ पडली नाही.
या मतदारसंघातून मनसेने माजी महापौर अशोक मुर्तडक यांना उमेदवारी दिली. त्यांनी नामांकनही भरले; परंतु माघारीच्या दिवशी नाट्यमय घडामोडीत मुर्तडक यांनी माघार घेतली. त्यांच्या माघारीने कोणाला राजकीय लाभ होईल हे नव्याने सांगण्याची त्यावेळीदेखील गरज नव्हती. मात्र याचवेळी कॉँग्रेस आघाडीतच बिघाडी झाली. जागावाटपात पूर्वची जागा कॉँग्रेसच्या वाट्याला असल्याने ही जागा कॉँग्रेसने कवाडे गटाला सोडलेली असताना राष्ट्रवादीने सानप यांना उमेदवारी देऊन बिघाडी केली; मात्र मतदारसंघात भाजपविरुद्ध राष्ट्रवादी असे चित्र निर्माण होत असताना कवाडे गटाचे गणेश उन्हवणे यांनी माघार घ्यावी यासाठी दोन्ही पक्षांकडून प्रयत्न केले गेले. त्यात यश मिळू शकले नाही. त्यामुळे वरकरणी या मतदारसंघात तिरंगी लढतीचे चित्र असले तरी, खरी लढत सानपविरुद्ध ढिकले अशीच झाली होती.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.