ETV Bharat / state

मनमाड-नांदगावला बकरी ईद साधेपणाने साजरी, घरातच नमाज पठण - Manmad latest news

कोरोना व लॉकडाऊनचे सावट वर्षभरात आलेल्या सर्व छोट्या मोठ्या सणांवर पडले. सरकारने देखील कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून सण उत्सव सामूहिकरित्या साजरे करण्यास परवानगी नाकारली. कित्येक मंदिरे श्रावण महिना असूनही बंदच आहेत. त्याचप्रमाणे मुस्लीम बांधवांचा ईद-उल-अजहा अर्थात बकरी ईद हा सण देखील नियमांच्या चाकोरीतच साजरा करावा लागला.

Corona effect on bakri eid
Corona effect on bakri eid
author img

By

Published : Aug 1, 2020, 12:15 PM IST

मनमाड - राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतच आहे. त्याचा परिणाम जनजीवनासह धार्मिक सण उत्सव यांच्यावरही झाला आहे. त्याचप्रमाणे बकरी ईदवरही कोरोना व लॉकडाऊनचे सावट पाहायला मिळाले. आज मुस्लीम बांधवानी रमजान ईद प्रमाणेच शहरातील ईदगाह मैदान आणि मशिदमध्ये सामूहिक नमाज पठण न करता घरातच साध्या पद्धतीने बकरी ईद साजरी केली.

कोरोना व लॉकडाऊनचे सावट वर्षभरात आलेल्या सर्व छोट्या मोठ्या सणांवर पडले. सरकारनेदेखील कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून सण उत्सव सामूहिकरित्या साजरे करण्यास परवानगी नाकारली. कित्येक मंदिरे श्रावण महिना असूनही बंदच आहेत. त्याचप्रमाणे मुस्लीम बांधवांचा बकरी ईद हा सण देखील नियमांच्या चाकोरीतच साजरा करावा लागला.

रमजान ईदप्रमाणेच मनमाड, शहर आदी भागात मुस्लीम बांधवानी सामूहिक नमाज अदा करण्यासाठी ईदगाह मैदान व मशिदीमध्ये न जाता त्यांनी घरात साध्या पद्धतीने ईद साजरी केली आहे. यामुळे या काळात आलेले अनेक मोठे सण उत्सव अत्यंत साधेपणाने आणि घरातल्याघरात साजरे करावे लागले. मुस्लिम धर्मियांच्या रमजान ईद व बकरी ईददेखील अत्यंत साधेपणाने साजरे करण्यात आले. मालेगाव शहरातील सर्व मुस्लीम बांधवांनी यावर्षी आपल्या घरातच नमाज पठण केले. अत्यंत साधेपणाने बकरी ईद साजरी केली.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.