ETV Bharat / state

नाशिक : ११ हजार ७४८ उमेदवारांनी दिली एमपीएससीची परीक्षा

महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे रविवारी कोविड प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करून, एमपीएससी पुर्व परीक्षा घेण्यात आली आहे. नाशिक शहरातील ४६ केंद्रांवर ११ हजार ७४८ उमेदवारांनी दिली. तर ६ हजार ३२३ जण गैरहजर होते. नाशिकरोड येथील के. जे. महेता विद्यालयातील परीक्षा केंद्रावर कोरोनाची लक्षणे असलेल्या परीक्षार्थीने पीपीई कीट घालून परीक्षा दिली.

११ हजार ७४८ उमेदवारांनी दिली एमपीएससीची परीक्षा

author img

By

Published : Mar 21, 2021, 8:43 PM IST

नाशिक - महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे रविवारी कोविड प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करून, एमपीएससी पुर्व परीक्षा घेण्यात आली आहे. शहरातील ४६ केंद्रांवर ११ हजार ७४८ उमेदवारांनी दिली. तर ६ हजार ३२३ जण गैरहजर होते. नाशिकरोड येथील के. जे. महेता विद्यालयातील परीक्षा केंद्रावर कोरोनाची लक्षणे असलेल्या परीक्षार्थीने पीपीई कीट घालून परीक्षा दिली आहे. त्याच्यासाठी स्वतंत्र वर्गखोलीची व्यवस्था करण्यात आली होती. तसेच इतर उमेदवारांना देखील मास्क व सॅनिटायर पुरवण्यात आले.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे तब्बल दोन वर्षांनंतर आणि चार वेळा स्थगीत करण्यात आलेली राज्यसेवेची पुर्व परीक्षा रविवारी घेण्यात आली. राजपत्रीत अधिकारी वर्ग अ गटातील पदांसाठी नाशिक शहरातील ४६ केंद्रांवर कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करून परीक्षा पार पडली. सकाळी ८ वाजेपासूनच परीक्षा केंद्रवार उमेदवारांना प्रवेश देण्यात आला. त्यानंतर सकाळी १० ते १२ या वेळेत पहिला पेपर पार पडला. तर दुपारी ३ ते ५ या वेळेत दुसरा पेपर झाला. पहिल्या सत्राच्या तुलनेत दुसऱ्या सत्रात आणखी ५३ परीक्षार्थींनी दांडी मारली.

कोरोनाची लक्षणे असणाऱ्या परीक्षार्थींसाठी पीपीई कीटची व्यवस्था

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व परीक्षार्थींना मास्क व सॅनिटायरचे वाटप करण्यात आले होते. तसेच कोरोनाची लक्षणे असणाऱ्या परीक्षार्थींसाठी पीपीई कीट घालून परीक्षा देण्याची व्यवस्था करण्यात आली होती. त्यानुसार नाशिकरोड येथील केंद्रावर एका परीक्षार्थीने पीपीई कीट घालून परीक्षा दिली. त्याच्यासाठी स्वतंत्र आसन व्यवस्था करण्यात आली होती. युवासेनेच्या वतीने विविध केंद्रांवर परीक्षार्थींना गुलाब पुष्प देवून शुभेच्छा देण्यात आल्या. ठक्कर बाजार, जुने सीबीएस तसेच महामार्ग बसस्थानकात जादा बसेस सकाळपासून सज्ज ठेवण्यात आल्या होत्या. परीक्षा संपल्यानंतर उमेदवारांनी परताना एसटीचा आधार घेतला. पुणे, औरंगाबाद, धुळे या मार्गावर जादा बसेस सोडण्यात आल्याचे एसटी प्रशासनाने सांगितले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.