नाशिक - महाराष्ट्र राज्य आरोग्य खाते, अंगणवाडी आशा वर्कर्स आणि गटप्रवर्तक संघटनेतर्फे नाशिक शहरात आमरण उपोषण सुरू केले. त्यामुळे आजपासून या संघटनांच्या कामगारांतर्फे कामकाजावर बहिष्कार टाकण्यात आला आहे.
महाराष्ट्र राज्य अंगणवाडी आशा आणि गटप्रवर्तक कर्मचारी कृती समिती यांनी आजपासून (मंगळवार) आपल्या न्याय व प्रलंबित मागण्यांसाठी शेवटचा पर्याय म्हणून उपोषणाचा निर्णय घेतला आहे. शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा मिळावा. आशा स्वयंसेविकांना शासकीय सेवेत कायम नियुक्त करेपर्यंत अंगणवाडी सेविकांप्रमाणे मानधन मिळावे यासारख्या विविध मागण्यांसाठी हे उपोषण करण्यात येत आहे.
हेही वाचा -राज्यात आठ महिन्यात स्वाईन फ्लूचे 197 बळी, नाशिकमध्ये सर्वाधिक 33
परिस्थितीचे गांभीर्य ओळखून महाराष्ट्र शासनाने निवडणुकीच्या आचारसंहिते पूर्वी निर्णय घ्यावा. जो पर्यंत प्रशासनाकडून लेखी स्वरूपात उत्तर मिळत नाही तो पर्यंत आमरण उपोषण हे सुरूच राहणार, असल्याचा इशारा यावेळी देण्यात आला. आंध्रप्रदेश सरकार आशा सेविकांना 10 हजार रुपये मानधन सुरु केले आहे. मात्र, महाराष्ट्र सरकार फक्त आश्वासन देत आहे, याचा निषेध करण्यासाठी नाशिक येथे आशा, गट प्रवर्तक मोठ्या संख्येने उपस्थित होते.