ETV Bharat / state

PFI member arrest: पीएफआयच्या अटक झालेल्या सदस्यांचे जर्मन बेकरीसह हैदराबाद ब्लास्टशी कनेक्शन? संशयितांना १४ दिवसांची कोठडी

राज्य दहशतविरोधी पथकाने ताब्यात घेतलेल्या पीएफआयच्या 5 संशयितांचा (PFI member arrest) जर्मन बेकरी (German bakery) आणि हैदराबाद ब्लास्टशी (Hyderabad blast) कनेक्शन असल्याचा संशय आहे. सत्र न्यायालयाने या पाचही संशयितांना 14 दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे.

PFI member arrest
PFI member arrest
author img

By

Published : Oct 4, 2022, 12:21 PM IST

नाशिक: राज्य दहशतविरोधी पथकाने ताब्यात घेतलेल्या पीएफआयच्या 5 संशयितांचा (PFI member arrest) जर्मन बेकरी (German bakery) आणि हैदराबाद ब्लास्टशी (Hyderabad blast) कनेक्शन असल्याचा संशय आहे. त्यांंच्या विदेशातील मोठ्या आर्थिक व्यवहाराचा देखील उल्लेख एटीएसने केला आहे. सत्र न्यायालयाने या पाचही संशयितांना 14 दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे.

मालेगाव, पुणे, कोल्हापूरातही अटक: राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या आदेशा नुसार महाराष्ट्र दहशतविरोधी पथकाने 22 सप्टेंबरला देशभरात छापे टाकून पीएफआयच्या पदाधिकाऱ्यांची धरपकड केली. नाशिक दहशतवादी विरोधी पथकाने देखील मालेगावमधून मौलाना सैफु रहमान सईद अन्सारी यांच्यासह पुणे येथून अब्दुल कय्युम, रझी अहमद खान, बीड मधुन वसीम अझीम उर्फ मुन्ना शेख, कोल्हापूरमधून मौला नसीसाब मुल्ला या प्रमुख पदाधिकाऱ्यांना अटक केली आहे. त्यांच्याकडून आता नवनवीन माहिती समोर येत आहे.

जर्मन बेकरी ब्लास्टशी कनेक्शन: पुण्यातील जर्मन बेकरी ब्लास्ट प्रकरणातील फरारी असलेल्या संशयितांशी पीएफआयच्या या संशयितांचा संबंध असल्याचे पुरावे एटीएसच्या हाती लागले आहेत. त्याचप्रमाणे हैदराबाद येथील दुहेरी ब्लास्ट प्रकरणातील फाशीवर गेलेल्या आरोपीशीही या संशयितांचे कनेक्शन असल्याचे तपासात समोर आल्याचे न्यायालयात सांगण्यात आले आहे.

मौलानाने घेतले होते गोळीबाराचे प्रशिक्षण: मालेगावातून अटक करण्यात आलेला मौलाना सैफु रहमान सईद अहमद अन्सारी याने फायरिंगचे प्रशिक्षण घेतले आहे. पुण्यातील जर्मन बेकरी स्फोट आणि हैदराबाद येथील दुहेरी ब्लास्ट प्रकरणाशीही या संघटनेचा प्रत्यक्ष सहभाग असल्याचे पुरावे समोर येत आहे..

विदेशात मोठ्या आर्थिक व्यवहाराचा संशय: संशयितांच्या बँक खात्यातून मोठ्या प्रमाणात आर्थिक उलाढाल झाली असून, यामागे परकीय हात असण्याचीही शक्यता वर्तविण्यात आली आहे. संशयितांकडून जप्त करण्यात आलेल्या हार्डडिक्समधील माहिती अत्यंत देशविघातक असल्याचीही भीती न्यायालयात व्यक्त करण्यात आली आहे. या सर्वांचा कसून शोध घेण्यासाठी ‘एटीएस’च्या मागणीनुसार, ‘पॉप्युलर फ्रंड ऑफ इंडिया’च्या पाचही संशयितांना नाशिक जिल्हा न्यायालयाने 17 ऑक्टोबरपर्यंत 14 दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.

देशविघातक माहितीची कागदपत्रे: एटीएस पथकाने न्यायालयात दिलेल्या माहितीनुसार पाचही संशयित एकमेकांच्या संपर्कात आहेत. सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांच्यात झालेले संवाद आक्षेपार्ह आहेत. त्यांच्या संवादातील आवाजाचे नमुने फॉरेन्सिक एजन्सीकडे चाचणीसाठी पाठविण्यात आले आहेत. पाचपैकी काही संशयितांनी दुबई, सौदी अरेबिया आदी आखाती देशांचे दौरे केले आहेत. त्यांच्याकडून जप्त करण्यात आलेल्या साहित्यामध्ये काही देशविघातक कागदपत्रे सापडले आहेत. मात्र याबाबतची महत्त्वाची कागदपत्रे न्यायालयासमोर सादर केल्यानंतर त्यावर सरकारी पक्षाने भाष्य करणे टाळले.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.