नाशिक - राज्य सरकारने एसटी कर्मचाऱ्यांच्या संपावर तोडगा काढल्यानंतरही जिल्ह्यात एसटी कर्मचाऱ्यांचा संप कायम आहे. मात्र जिल्ह्याच्या ग्रामीण भागात लाल परीच्या सुरक्षेसाठी ६५० पोलीस तैनात करण्यात आले आहे. बसेसवर होणाऱ्या दगडफेकीच्या घटना टाळण्यासाठी हा बंदोबस्त देण्यात आला आहे. जिल्ह्यातील सर्वच प्रमुख आगार आणि मार्गावर पोलिसांची गस्त आहे.
कठोर कारवाई होणार -
जिल्ह्यातील सर्वच प्रमुख आगार आणि मार्गांवर पोलिसांची गस्त असणार आहे. एसटीच्या सुरक्षेसाठी तब्बल सहाशे पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आलेले आहेत. राज्य सरकारने एसटी कर्मचाऱ्यांच्या संपावर तोडगा काढल्यानंतर नाशिक जिल्ह्यातील एसटी कर्मचाऱ्यांचा संप कायम आहे. मात्र जिल्ह्याच्या ग्रामीण भागात लाल परीच्या सुरक्षेसाठी आता ६५० पोलीस तैनात करण्यात आलेले आहेत. तसेच एसटीवर होणाऱ्या दगडफेकीच्या घटना टाळण्यासाठी हा बंदोबस्त देण्यात आलेला आहे. आता सुव्यवस्था हातात घेणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाईल, असा इशारा पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांनी दिला आहे.