ETV Bharat / state

नाशकात मद्यधुंद जवानांची पोलीस कर्मचाऱ्यांना मारहाण, अपहरणाचाही केला प्रयत्न

author img

By

Published : Jan 19, 2020, 9:19 AM IST

बीट मार्शल कर्मचारी पाटील व त्यांचे सहकारी सुधीर चव्हाण हे दोघेही शुक्रवारी रात्री गस्तीवर होते. दरम्यान, मध्यरात्री दीड वाजेच्या सुमारास शालिमार जवळील खडकाळी सिग्नल जवळ कार क्र.(०१ सी.जी २६९८) उभी असलेली दिसली. कारमध्ये दोघे जण मद्यप्राशन करतांना पोलिसांना दिसून आले. पोलिसांनी कारमधील दोघांना विचारले असता त्यांनी शिवीगाळ करत सुधीर चव्हाण यांना मारहाण केली.

nashik
आरोपींचे दृश्य

नाशिक- मद्यधुंद लष्करी जवानांनी पोलीस कर्मचाऱ्यांना मारहाण करत अपहरण करण्याचा प्रयत्न केल्याचा प्रकार समोर आला आहे. ही घटना शुक्रवारी मध्यरात्री शालिमार येथील खडकाळी सिंग्नल जवळ घडली. या प्रकरणी लष्कराच्या सेवानिवृत्त सुभेदार आणि कार्यरत असलेल्या सुभेदार यांच्या विरोधात भद्रकाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून त्यांना अटक करण्यात आली आहे. रोहित प्रल्हाद दापुरकर आणि मन्ना-डे, असे आरोपी लष्करी जवानांची नावे आहेत.

आरोपींचे दृश्य

रात्रीच्या गस्तीवर असलेले बीट मार्शल कर्मचारी दीपक पाटील यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, पाटील व त्यांचे सहकारी सुधीर चव्हाण हे दोघेही शुक्रवारी रात्री गस्तीवर होते. दरम्यान, मध्यरात्री दीड वाजेच्या सुमारास शालिमार जवळील खडकाळी सिग्नल जवळ कार क्र.(०१ सी.जी २६९८) उभी असलेली दिसली. कारमध्ये दोघे जण मद्यप्राशन करतांना पोलिसांना दिसून आले. पोलिसांनी कारमधील दोघांना विचारले असता त्यांनी शिवीगाळ करत सुधीर चव्हाण यांना मारहाण केली. पोलिसांनी कार पोलीस ठाण्यात घेऊन चला, असे मद्यपींना सांगितले आणि पोलीस कर्मचारी पाटील हे मद्यपींच्या कारमध्ये बसले. मात्र, दोघाही मद्यपींनी कार पोलीस ठाण्यात घेऊन न जाता द्वारका मार्गे भरधाव वेगात नाशिक-पुणे रोडवर थेट वडनेर गेट येथे घेऊन गेले. तोपर्यंत चव्हाण यांनी नियंत्रण कक्षाला माहिती कळवली होती.

मिळालेल्या माहितीवरून नाईट राऊंडला असलेल्या पोलीस अधिकाऱ्यांनी मद्यपी जावानांच्या कारचा पाठलाग केला व तिला वडनेर गेटवर अडवले. आणि कारमधील पोलीस कर्मचाऱ्यांची सुटका केली. चौकशीत रोहित प्रल्हाद दापुरकर हे सेवानिवृत्त सुभेदार असून मन्ना डे हे लष्करात सुभेदार पदावर कार्यरत आहेत. या दोघांच्या विरोधात अपहरण, मारहाण आणि सरकारी कामात अडथळा आणल्या प्रकरणी भद्रकाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या दोघांनाही पोलिसांनी अटक केली असून न्यायालयात हजर केले असता त्यांना एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. एकीकडे लष्करी जवानांना मानसन्मान मिळत असतो. मात्र, अशा कृत्यामुळे सर्वत्र संताप व्यक्त केला जात आहे.

हेही वाचा- मंगला अन् तपोवन एक्स्प्रेसमध्ये तांत्रिक बिघाड; दोन्ही गाड्यांचे वेळापत्रक कोलमडले

Intro:मद्यधुंद लष्करी जवानांची पोलीस कर्मचाऱ्यांना मारहाण,करत अपहरण करण्याचा प्रयत्न..

Body:मद्यधुंद लष्करी जवानांची पोलीस कर्मचाऱ्यांना मारहाण,करत अपहरण करण्याचा प्रयत्न करण्याचा प्रकार शुक्रवारी मध्यरात्री शालिमार येथील खडकाळी सिंगल जवळ घडला,या प्रकरणी लष्कराच्या सेवानिवृत्त सुभेदार आणि कार्यरत असलेल्या सुभेदार यांच्या विरोधात भद्रकाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला,या दोघांनाही पोलिसांनी अटक केली असून, न्यायालयात हजर केले असता त्यांना एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली...

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,रात्रीच्या गस्तीवर असलेले बीट मार्शल कर्मचारी दीपक पाटील यांनी दिलेल्या तक्रारीनुसार,रात्री बीट मार्शल पाटील त्याचे सहकारी सुधीर चव्हाण यांच्या सोबत
गस्तीवर होते.अशात रात्री दीड वाजेच्या सुमारास शालिमार जवळील खडकाळी सिग्नल जवळ,कार क्रमांक 01 सीजी 2698 उभी असलेली दिसली ह्यात..दोघे जण जण मद्यप्राशन करतांना दिसून आले...कार मधील दोघांना पोलिसांनी विचारले असता त्यांनी शिवीगाळ करत चव्हाण यांना मारहाण केली,पोलिसांनी कार पोलीस ठाण्यात घेऊन चला असे सांगितलं,
पोलीस कर्मचारी पाटील कार मध्ये बसले,मात्र संशयितांनी कार पोलीस ठाण्यात घेऊन न जाता द्वारका मार्गे भरधाव वेगात नाशिक-पुणे रोडवर थेट वडनेर गेट येथे घेऊन गेले,तोपर्यंत चव्हाण यांनी नियंत्रण कक्षाला माहिती कळवली,आणि नाईट राऊंड ला असलेल्या पोलीस अधिकाऱ्यांनी संशयितांच्या कारचा पाठलाग करत, कार वडनेरे गेटवर अडवली, आणि कार मधील पोलिस कर्मचाऱ्याची सुटका करण्यात आली,चौकशीत रोहित प्रल्हाद दापुरकर सेवानिवृत्त सुभेदार असून मन्ना डे हे लष्करात सुभेदार पदावर कार्यरत आहे..या दोघांच्या विरोधात अपहरण, मारहाण आणि सरकारी कामात अडथळा आणल्या प्रकरणी भद्रकाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे..एकीकडे लष्करी जवानांना मानसन्मान मिळतं असतो मात्र अशा कृत्यामुळे सर्वत्र संताप व्यक्त केला जात आहे ...

टीप फीड ftp
nsk soldiers crime viu 1
nsk soldiers crime viu 2

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.