ETV Bharat / state

नाशकात दसऱ्याच्या मुहूर्तावर तीनशे कोटींची उलाढाल

author img

By

Published : Oct 26, 2020, 7:34 PM IST

साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या दसऱ्याचा मुहूर्त साधत नाशिककरांनी विविध वस्तू खरेदीसाठी उत्साह दाखवला. दसऱ्याच्या मुहूर्तावर तब्बल तीनशे कोटींची उलाढाल नाशिकमध्ये झाली आहे.

दुकानातील गर्दी
दुकानातील गर्दी

नाशिक - साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या दसऱ्याचा मुहूर्त साधत नाशिककरांनी घर, वाहने, सोने खरेदी करण्यासाठी उत्साह दाखवला. मागील वर्षीपेक्षा यंदा सर्वच वस्तूंची विक्री झाली असून साधारण 300 कोटींची उलाढाल झाल्याचा अंदाज आहे. कोरोना काळात खऱ्या अर्थाने बाजाराने सीमोल्लंघन केल्याचे चित्र बघायला मिळाले.

मिळालेल्या माहितीनुसार रिअल इस्टेट क्षेत्रात तब्बल 700 पेक्षा अधिक फ्लॅट, रो हाऊस, पेंट हाऊसची बुकिंग व विक्री झाली तसेच गृहकर्जावरील व्याजदर कमी झाल्याने नागरिकांनी घर खरेदीला सर्वाधिक पसंती दिली. त्याचबरोबर वाहन बाजारातही गर्दी झाल्याचे दिसून आले.

माहिती देताना सुवर्णकार
  • वाहन खरेदीकडे ग्राहकांचा कल

कोरोनाचे संकट असल्याने सार्वजनिक वाहतूक अधिक धोकादायक ठरू शकते त्यामुळे स्वतःचे वाहन असावे या विचारातून वाहन खरेदीला ग्राहकांची प्राधान्य दिले. यात चारचाकी वाहनांची सुमारे अडीच हजार तर दुचाकी वाहनांची सुमारे साडेतीन हजारांच्या विक्री झाली. त्याच पाठोपाठ फ्रीज, वॉशिंग मशीन, टीव्ही, मोबाइल आदी इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदीचा योग देखील ग्राहकांनी साधला.

दुकानातील गर्दी
दुकानातील गर्दी
  • सोने खरेदीवर होत्या अनेक ऑफर्स

तसेच सोने खरेदीसाठी नाशिक येथे मोठी गर्दी पहायला मिळाली, कोरोना संकटात पहिल्याच मुहूर्तावर ग्राहकांचा सोने खरेदीचा उत्साह दिसून आला. येत्या काही दिवसांत लग्नाचे मुहूर्त असल्याने अनेकांनी दागिने खरेदीसाठी दसऱ्याचा मुहूर्त साधला. दसऱ्याच्या मुहूर्तावर सोने खरेदीला महत्त्व असल्याने सुवर्ण व्यावसायिकांनी ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी विविध ऑफर्स दिल्या होत्या. त्यात विशिष्ट खरेदीवर घडणावळात सूट, लकी ड्रॉ, सोने खरेदीवर चांदी मोफत अशा ऑफर्स दिल्या होत्या. यावेळी ग्राहकांनी बांगड्या, चेन, मंगळसूत्र, पेंडेंट, पाटल्या, अंगठी आदींची मोठ्या प्रमाणात खरेदी केली.

  • चोख सोने खरेदीलाही पसंती

तसेच एक ग्रॅमपासून 50 ग्रॅमपर्यंतची सोन्याची बिस्किटे, वेढणी खरेदीलाही पसंती दिली. चोख सोन्याला मागणी असल्याने अनेक सराफ व्यावसायिकांनी चोख सोने विक्रीसाठी वेगळे काऊंटर उपलब्ध करून दिले होते.

हेही वाचा - येवला बाजार समितीत कांद्याचा लिलाव बेमुदत बंद

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.