ETV Bharat / state

Anti Witchcraft Law : अंद्धश्रद्धा आणि जादूटोणा विरोधा कायदा जास्त कडक करावा - अंनिस - कायद्याची अधिक प्रभावीपणे अंमलबजावणी व्हावी

नाशिकमध्ये काही हिंदुत्ववादी संतांनी रामकुंड येथे जमत अंधश्रद्धा आणि जादूटोणा विरोधी कायदा रद्द करावा अशी मागणी केली आहे. परंतु दुसऱ्या बाजुने ह्या कायद्याची प्रभावीपणे अंमलबजावणी व्हावी, कायदा आणखी कडक व्हावा,अशी मागणी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने केली आहे.

Anti Witchcraft Law
अंधश्रद्धा आणि जादूटोणा
author img

By

Published : Jan 23, 2023, 3:44 PM IST

नाशिक : डाॅ. नरेंद्र दाभोलकर यांच्या खुनानंतर महाराष्ट्रात जादूटोणा विरोधी कायदा लागू झाला. असा कायदा करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य ठरले आहे. या कायद्याला नऊ वर्ष पूर्ण झाली आहेत. दिड हजाराहून अधिक गुन्हे या कायद्याअंतर्गत दाखल झाले आहेत. हा कायदा केवळ हिंदू धर्मातील लोकांना लागू पडेल, असा आरोप काही लोकांनी केला होता, आजही करत आहेत. पण हा कायदा सर्व धर्मासाठी लागू आहे, असे अंनिसने म्हटले आहे.

कायदा सर्व धर्मियांना लागू : पहिला गुन्हा मुस्लिम भोंदुच्या विरोधात नांदेड येथे तर दुसरा गुन्हा नाशिक रोड येथे नवबौद्ध समाजातील आरोपीच्या विरोधात दाखल झालेला आहे. नंतर हिंदु आरोपीच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे. पहिल्या शंभर गुन्ह्यांची नोंद महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने ठेवली आहे. त्यात शंभरपैकी वीस घटनांमध्ये मुस्लिम व्यक्तींच्या विरोधात गुन्हे दाखल झाले आहेत. लोकसंख्येचा विचार करता हे प्रमाण लक्षणीय आहे. त्यामुळे या कायद्याबाबत गैरसमज पसरविणाऱ्यांना कृतिशील उत्तर मिळाले आहे.

या विरोधात गुन्हे दाखल : नरबळी देणे अथवा देण्याचा प्रयत्न करणे, करणी, भानामती, जादूटोणा अथवा भुत उतरवण्याच्या बहाण्याने अंगाला चटके देणे, त्यासाठी जबरदस्तीने मानवी विष्ठा खाऊ घालणे, तोंडात कोंबणे, मारहाण करणे, चमत्काराचा दावा करून स्त्रीयांचे लैंगिक शोषण करणे, गुप्तधन काढण्याच्या हेतूने अघोरी प्रथांचा अवलंब करणे, दैवी शक्तींचा दावा करून महिलांना नग्नपूजा करण्यास जबरदस्ती करणे, डाकिण समजून त्रास देणे, पैशाचा पाऊस पाडण्याच्या बहाण्याने फसवणूक करणे, आदी अमानुष घटनांमुळे गुन्हे नोंद झाल्याचे दिसून येत आहे, असे अंनिसने म्हटले आहे.

कायदा अधिक कडक करावा : महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती या कायद्याचा प्रचार प्रसार करत आहे. मात्र मर्यादा व क्षमता याचा विचार केल्यास हे प्रयत्न अपुरे आहेत. तरी या कायद्याची प्रभावीपणे अंमलबजावणी होण्यासाठी शासनाने पुढाकार घ्यावा, या कायद्याचे नियम बनवावेत व कायदा अधिक कडक करावा, अशी मागणी महाराष्ट्र अंनिसचे पदाधिकारी डाॅ.टी.आर.गोराणे, कृष्णा चांदगुडे व ॲड समीर शिंदे, महेंद्र दातरंगे यांनी केली आहे.

हेही वाचा : Anti Witchcraft Law अंधश्रद्धा आणि जादूटोणाविरोधी कायदा रद्द करा नाशिकमधील साधू महंत आज करणार आंदोलन

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.