ETV Bharat / state

जितेंद्र भावे यांच्यावर आणखी एक गुन्हा दाखल; व्हिजन हॉस्पीटलची तक्रार - सरकारवाडा पोलीस ठाणे

गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असलेल्या आम आदमी पक्षाचे प्रवक्ते जितेंद्र भावे यांच्यावर सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. व्हिजन हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी दिलेल्या तक्रारीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून भावे हे 'ऑपरेशन हॉस्पिटल' ही मोहीम चालवत आहेत. समाज माध्यमांवर लाईव्ह करत रुग्णालयांकडून आकारल्या जाणाऱ्या अवाजवी बिलाबाबत भावे आंदोलन करत आहे.

सरकारवाडा पोलीस ठाणे
author img

By

Published : May 27, 2021, 5:55 PM IST

नाशिक - आम आदमी पार्टीचे प्रवक्ते जितेंद्र भावे यांनी डॉक्टरांना धमकावल्या प्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर दुसरीकडे मात्र व्होकहार्ट रुग्णालयात गोंधळ घातल्याप्रकरणी मुंबई नाका पोलिसांनी भावे यांना समन्य नोटीस पाठवली आहे. तसेच दबाव टाकणाऱ्या समर्थकांवरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असलेल्या आम आदमी पक्षाचे प्रवक्ते जितेंद्र भावे यांच्यावर सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. व्हिजन हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी दिलेल्या तक्रारीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून भावे हे 'ऑपरेशन हॉस्पिटल' ही मोहीम चालवत आहेत. समाज माध्यमांवर लाईव्ह करत रुग्णालयांकडून आकारल्या जाणाऱ्या अवाजवी बिलाबाबत भावे आंदोलन करत आहे.

जितेंद्र भावे यांच्यावर पुन्हा एक गुन्हा दाखल

साथरोग सुधारणा कायद्यांतर्गत गुन्हा दाखल

आम आदमी पक्षाचे जितेंद्र भावे यांच्यावर आणखी एक गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नाशिकच्या सरकारवाडा पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. काही दिवसांपूर्वी व्होकहार्ट रुगाणालयात अर्धनग्न आंदोलन केल्याप्रकरणी मुंबई नाका पोलिसांनी ताब्यात घेत त्यांना समज देण्यात आली होती. त्यातच आता नाशिकच्या कॉलेज रोड परिसरातील 'व्हिजन हॉस्पिटल'मध्ये रुग्णांचे थकीत बिल अदा न करता निघून गेले. त्यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. तर कोरोना बाधित रुग्णाचा मृत्यू झाल्याने रुग्णालय प्रशासनाला धमकावून कामात अडथळा आणत वैद्यकीय सेवा संस्थेत हिंसक कृत्य आणि मालमत्तेची हानी केल्याप्रकरणी साथरोग सुधारणा कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. डॉ. विक्रांत विनोद यांनी दिलेल्या फिर्यादीवरून नाशिकच्या सरकारवाडा पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

रुग्णालयांविरोधात आवाज उठवू - भावे

ऑपरेशन हॉस्पिटल मोहिमेअंतर्गत नाशिक शहरातील वेगवेगळ्या रुग्णालयांमध्ये जाऊन अवाजवी बिलाविरुद्ध भावे सोशल मीडियावर लाईव्ह व्हिडिओ करून रुग्णालय प्रशासनाला जाब विचारत असतात. काही दिवसांपूर्वी मुंबईनाका परिसरात असलेल्या व्होकहार्ट हॉस्पिटलमध्ये केलेल्या आंदोलनामुळे ते सध्या चर्चेमध्ये आहे. सोशल मीडियावर ते करत असलेल्या कार्याबाबत संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत. मात्र आपल्यावर कितीही गुन्हे दाखल झाले तरी आपण रुग्णांची पिळवणूक करणाऱ्या रुग्णालया विरोधात आवाज उठवू, असे जितेंद्र भावे यांनी स्पष्ट केल आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.