ETV Bharat / state

Thackeray group: ठाकरे गटाला पुन्हा झटका! ठाकरे गटाचे माजी आमदारांसह माजी नगरसेवक शिंदे गटात प्रवेश

शिंदे गटाकडून नाशिक जिल्ह्यातील ठाकरे गटाला सुरुंग लावण्याचे काम सुरू असून, नाशिक जिल्ह्यातील ठाकरे गटाचे माजी आमदारांसह माजी नगरसेवक शिंदे गटात प्रवेश करणार आहेत.

Etv Bharat
Etv Bharat
author img

By

Published : Dec 27, 2022, 3:54 PM IST

नाशिक - पंधरा दिवसांपूर्वी नाशिक जिल्ह्यातील शहरातील ठाकरे गटातील प्रमुख पदाधिकाऱ्यांसह 11 माजी नगरसेवक शिंदे गटात सामील झाले. याला काही दिवस उलटत नाही तोच आता नाशिक जिल्ह्यातील ठाकरे गटातील माजी आमदार धनराज महाले यांच्यासह माजी नगरसेविका मंदाकिनी जाधव, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे माजी नगरसेवक हरीश भाडंगे, मनसेच्या माजी नगरसेविका मेघा साळवे हे शिंदे गटात प्रवेश करणार आहेत. ते या प्रवेशासाठी नागपूरच्या दाखल झाले आहेत.

या आधी यांनी घेतला प्रवेश - ठाकरे गटाचे माजी विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते यांच्यासह चंद्रकांत खोडे, सूर्यकांत लवटे, पुनम मोगरे, आर डी धोंगडे, ज्योती खोले, सुदाम ढेमसे, जयश्री खर्जुल, सुवर्णा मटाले, डी. जी सूर्यवंशी, श्याम कुमार साबळे, अमोल जाधव यांच्या सह मनसेचे शहर समन्वयक सचिन भोसले आणि भाजप शहर पदाधिकारी प्रताप मेहरोलिया यांनी प्रवेश केला आहे.

जिल्हा प्रमुख पदाचा राजीनामा - खासदार संजय राऊत यांनी ट्विट करत पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने नाशिक जिल्हा संपर्क प्रमुख भाऊ चौधरी यांची ( Thackeray group sacked Bhau Chaudhary ) हकालपट्टी असल्याचे जाहीर केले. त्यानंतर सुनील भास्करराव पाटील शिवसेना जिल्हाप्रमुख, नाशिक ग्रामीण ( उद्धव गट ) यांनी शिवसेना जिल्हा प्रमुख पदाचा ( Sunil Patil resigned ) राजीनामा दिला आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आगे बढो - सुनील पाटील यांनी फेसबुकवर पोस्ट टाकत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पाठिंबा दिला आहे. आमचे संपर्क प्रमुख भाऊसाहेब चौधरी यांच्या समर्थनार्थ माझ्या शिवसेना जिल्हाप्रमुख पदाचा राजीनामा देत आहे. असे सुनील पाटील फेसबुकवर म्हणाले आहेत. तसेच, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आगे बढो. हम नाशिककर आपके साथ है, असे देखील सुनील पाटील म्हणाले ( Sena leader Sunil Patil fb post ) आहेत.

संपर्कप्रमुख पदाचा राजीनामा - नाशिक शहरातील ठाकरे गटातील 13 नगरसेवकांनी शिंदे गटात प्रवेश केला. हा उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का मानला जात असतांना आता जिल्हा संपर्क प्रमुखालाही आपल्याकडे वळण्यात शिंदेंना यश आले आहे. भविष्यात उद्धव ठाकरे गटातील अनेक पदाधिकारी तसेच नगरसेवक शिंदे गटात दाखल होतील अशी चर्चा नाशिकमध्ये आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.