ETV Bharat / state

समोर पैलवान दिसत नाही, तर 'यांना' काय आखाडा खणायला आणलंय का, अमोल कोल्हेंचा मुख्यमंत्र्यांना सवाल - पंकज भुजबळ

निवडणुकीच्या आखाड्यात कोणताही पैलवान उरला नसल्याचे वक्तव्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले होते. यानंतर राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे यांनी प्रत्युत्तर देताना फडणवीस यांच्यावर टीका केली आहे.

राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्यावर टीका केली आहे.
author img

By

Published : Oct 12, 2019, 11:51 AM IST

नाशिक - निवडणुकीच्या आखाड्यात कोणताही पैलवान उरला नसल्याचे वक्तव्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले होते. यानंतर राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे यांनी प्रत्युत्तर देताना फडणवीस यांच्यावर टीका केली आहे.

राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्यावर टीका केली आहे.

'हा' गडी कोणत्याही बाजूने पैलवान वाटत नसल्याचा टोला त्यांनी मुख्यमंत्र्यांना लगावला. तसेच आखाड्यात कोणीही नाही, असे फडणवीस म्हणत असल्यास पंतप्रधान मोदी व गृहमंत्री अमित शाह यांच्या राज्यभरात जवळपास 30 सभा घेण्यामागचे कारण काय, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. नांदगाव मतदारसंघात पंकज भुजबळ यांच्या प्राचारार्थ आयोजित प्रचारसभे दरम्यान खासदार कोल्हे यांनी सत्ताधाऱ्यांवर टीका केली.

शिवसेनेबद्दल बोलताना, छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाची एकही विट न रचता घोटाळा करणाऱ्यांना आणि महाराजांचे गड-किल्ले हेरिटेज हॉटेलसाठी भाड्याने देणाऱ्यांना जनता धडा शिकवणार असल्याचे कोल्हे म्हणाले. तसेच शिवसेनेच्या वाघाची केव्हाच शेळी झाल्याची टीका त्यांनी केली आहे.

यावेळी माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनीही जोरदार फटकेबाजी करून केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांच्यावर टीकास्त्र सोडले. 'आपल्या सुरक्षेसाठी राफेल आणि राफेलच्या सुरक्षेसाठी लिंबू' असे गणित असेल, तर ही पॉवरफुल लिंबू सर्वत्रच लावा, असा टोली भुजबळ यांनी लगावला.

आमदार पंकज भुजबळ व जिल्ह्यातील सर्व जागांवर उभ्या असलेल्या आघाडीच्या उमेदवारांना भरघोस मतांनी विजयी करण्याचे आवाहन खासदार कोल्हे व छगन भुजबळ भाषणात यांनी केले.

Intro:मनमाड(आमिन शेख):राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे म्हणतात की आम्ही आखाड्यात उतरलोय पण समोर कुणी पहिलवानच दिसत नाही पहिला प्रश्न असा की हा गडी मागून पुढून खालून वरून कुठूनच पहिलवान वाटत नाही राहिला प्रश्न समोर कोणी नसल्याचा तर भारताचे पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री अमित शाह हे महाराष्ट्रात जवळपास 30 सभा घेताय त्या कशासाठी असा खोचक टिका राष्ट्रवादीचे खासदार डॉ अमोल कोल्हे यांनी नांदगांव येथे केली.Body:यावेळी बोलतांना कोल्हे यांनी शिवसेनेवर टीका करत छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाची एकही विट न रचता घोटाळा करणाऱ्यांना तसेच त्यांचे गड किल्ले हेरिटेज हॉटेल साठी भाड्याने देण्याचा निर्णय घेणाऱ्याना जनता आता धडा शिकवणार आहे तसेच शिवसेनेच्या वाघाची केव्हाच शेळी झाली असल्याची टीकाही त्यांनी केली.नांदगांव विधानसभा निवडणुकीत आमदार पंकज भुजबळ यांच्या प्राचारार्थ आयोजित सभेत ते बोलत होते.यावेळी माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनीही जोरदार फटकेबाजी करत आपल्या खास शैलीत केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांच्यावर टीका केली आपल्या सुरक्षेसाठी राफेल आणि राफेलच्या सुरक्षेसाठी लिंबु जर लिंबु एवढा पॉवरफुल असेल तर सर्विकडे लिंबुच लावा बघू कसा पाकिस्तान येतो ते असे म्हणतात एकच हशा पसरला.
Conclusion:आमदार पंकज भुजबळ व जिल्ह्यातील सर्वच्या सर्व पंधरा जागेवर उभ्या असलेल्या आघाडीच्या उमेवारांना भरगोस मतांनी विजयी करण्याचे आव्हान खासदार कोल्हे व छगन भुजबळ यांनी केले.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.