ETV Bharat / state

नाशिकमध्ये गौरी पुजेची तयारी जोरात; बाजारपेठा सजल्या - गौरींच्या आगमनाचे वेध

गणपतीचे आगमन झाल्यानंतर सर्वांना गौरींच्या आगमनाचे वेध लागतात. गौरींच्या प्रतिष्ठापणेसाठी लागणाऱ्या साड्या, अलंकार, मिठाई खरेदीसाठी नाशिकमधील बाजारपेठेत महिलांची लगबग आहे.

नाशिकमधील बाजार पेठेत महिलांची लगबग
author img

By

Published : Sep 4, 2019, 5:10 PM IST

नाशिक - भाद्रपद महिन्यात शुक्ल पक्ष चतुर्थीला देशभरात गणपती बाप्पांची स्थापना होते. तीन दिवसानंतर महालक्ष्मी म्हणजे गौरीचे आगमन होते. गौरींच्या प्रतिष्ठापणेसाठी लागणाऱ्या साड्या, अलंकार, मिठाई खरेदीसाठी नाशिकमधील बाजार पेठेत महिलांची लगबग पाहायला मिळत आहे.

नाशिकमधील बाजार पेठेत महिलांची लगबग

गौरी-गणपतीचा सण महाराष्ट्रात मोठ्या श्रद्धेने आणि पारंपरिक पद्धतीने साजरा केला जातो. गौरींना माहेरवाशीण समजले जाते. पहिल्या दिवशी आपापल्या परंपरेनुसार घराच्या उंबऱ्यातून गौरी घरात आणल्या जातात.

हेही वाचा - मालेगावात मुसळधार : नाल्याला आलेल्या पुराचे पाणी शिरले नागरिकांच्या घरात

घरात सुख-शांती, संपत्ती नांदो अशी प्रार्थना गौरीकडे केली जाते. तसेच या गौरींना आणि तिच्या बाळांना गोडाचा नैवेद्य दाखवला जातो. तिसऱ्या दिवशी गौरींचे विसर्जन केले जाते. त्यांचे पाण्यात विसर्जन केल्यानंतर येताना थोडी वाळू घरी आणून ती सर्व घरभर टाकण्याची पद्धत आहे.

Intro:महालक्ष्मीचं साहित्य खरेदी साठी बाजारपेठा फुलल्या....

Body:भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या चतुर्थीला देशभरात गणपती बाप्पांची स्थापना होते,प्रत्येक घरात प्रथेनुसार गणपतीची प्राणप्रतिष्ठा केली जाते,आणि तीन दिवसानंतर महालक्ष्मी म्हणजे गौरीचं आगमन होतं.आणि ह्याच महालक्ष्मीसाठी लागणाऱ्या साड्या,अलंकार,मिठाई खरेदी साठी मोठी प्रमाणात महिलांची बाजार पेठेत लगबग दिसून आली...

गौरी-गणपतीचा सण महाराष्ट्रात मोठ्या श्रद्धेने आणि पारंपरिक पद्धतीने साजरा केला जातो,तीन दिवस आलेल्या माहेरवाशीणची सर्व हौस पुरवली जाते, पहिल्या दिवशी आपापल्या परंपरेनुसार घराच्या उंबऱ्यातुन गौरी घरात आणल्या जातात,ज्यांच्या हा
तात गौरी असतील त्या महिलेचे पाय दुधाने व पाण्याने धुतात, आणि त्यावर कुंकवाचे स्वस्तिक काढतात,

आणि घराच्या पासून गौरी बसायच्या जागेपर्यंत लक्ष्मीच्या पायाचे ठसे उमटले जातात,गौरीचे मुखवटे यावेळी आणले जातात ,त्यानंतर त्यांची स्थापना करण्यापूर्वी घरातील सर्व जागा गोष्टी दाखवण्याची प्रथा आहे,घरात सुख शांती ऐश्वर्या नांदो अशी प्रार्थना केली जाते,तसेच ह्या महालक्ष्मीनां आणि तिच्या बाळांना गोड धोड पूर्ण पोळी,लाडू, करंजी,शेव,चकली,सोळ्यात भाज्यांची एकत्रित भाजी नैव्यद दाखवला जातो..दोन दिवस महालक्ष्मीची हौसमोज झाल्यानंतर तिसऱ्या दिवशी महालक्ष्मीचे विसर्जन केलं जातं,महालक्ष्मीचं पाण्यात विसर्जन केल्यावर येताना थोडी वाळू घरी आणून ही सर्व घरभर टाकण्याची मान्यता आहे...
वन टू वन
कपिल भास्कर...

.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.