ETV Bharat / state

निवडणुकीच्या रणधुमाळीनंतर नाशकातील सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी मिसळवर मारला ताव

नेत्यांनो कार्यकर्तेदेखील काही कमी नाहीत, तुम्ही जसे सोयीनुसार एकत्र येतात तसे आम्हीदेखील एकत्र येऊ शकतो, असे नाशिकमधील कार्यकर्त्यांनी नेत्यांना दाखवून दिले आहे. मिसळ पार्टीला कार्यकर्त्यांचा नेत्यांना पडलेला विसर यासाठी कार्यकर्त्यांनी मिसळ पार्टीतून चोख उत्तर दिले

सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी मिसळवर मारला ताव
author img

By

Published : May 3, 2019, 8:17 PM IST

नाशिक - निवडणुकीचा धुरळा शांत बसतो न बसतो तोच सर्वपक्षीय उमेदवार आणि नेते मंडळी मांडीला मांडी लावून मिसळवर ताव मारताना दिसले. या पार्टीचे फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल आणि ट्रोल होत आहेत. कार्यकर्त्यांनी या मिसळ पार्टीचे आयोजन करत सर्वपक्षीय नेत्यांना आम्हीही कायमचे शत्रु नाही, असे दाखवून दिले आहे.

निवडणुकीच्या रणधुमाळीनंतर नाशकातील सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी मिसळवर मारला ताव

नाशिक मिसळ आणि त्या ठिकाणी होणाऱ्या वेगळ्या चर्चा सर्वश्रुत आहेत. त्यातच भर पडली ती निवडणूकीनंतरच्या सर्वपक्षीय उमेदवार आणि नेते मंडळींच्या मिसळपार्टीची. आरोप-प्रत्यारोप हे निवडणुकीपुरतेच मर्यादित असतात त्यानंतर शहराच्या विकासासाठी आणि नातेसंबंध जोडण्यासाठी आम्ही एकत्र आल्याचे नेत्यांनी सांगितले होते.

राजकारणात कुणी कुणाचा कायमचा शत्रू नसतो, असे नेहमीच नेत्यांकडून सांगितले जाते. परंतु कार्यकर्त्यांमध्ये हे कधीच पाहायला मिळत नाही, मात्र नाशिकमधील कार्यकर्त्यांनी प्रगल्भ मिसळ पार्टीचे आयोजन करत एक नवीन ट्रेंड सुरू केला आहे. शाम गोहाड यांनी या मिसळ पार्टीचे आयोजन केले आहे.

नेत्यांनो कार्यकर्तेदेखील काही कमी नाहीत, तुम्ही जसे सोयीनुसार एकत्र येतात तसे आम्हीदेखील एकत्र येऊ शकतो, असे नाशिकमधील कार्यकर्त्यांनी नेत्यांना दाखवून दिले आहे. मिसळ पार्टीला कार्यकर्त्यांचा नेत्यांना पडलेला विसर यासाठी कार्यकर्त्यांनी मिसळ पार्टीतून चोख उत्तर दिले आहे. नेत्यांना कोणता झेंडा घेऊ, असे म्हणणाऱ्या कार्यकर्त्यांनी एकत्र येत प्रगल्भ मिसळ पॅटर्न सुरू केला आहे. तर तर्रीदार मिसळीवर ताव मारत आमच्या शिवाय नेते पुढे कसे जाणार, असा सवाल उपस्थित करत नेते मंडळींना दणका दिला आहे. त्यामुळे या मिसळ पार्टीची नेते मंडळींसह नाशिककरांमध्येही चर्चा सुरू होती.

Intro:नाशिकमध्ये निवडणुकीचा धुरळा शांत बसतो न बसतो तोच सर्वपक्षीय उमेदवार आणि नेते मिसळ पार्टीत एकत्रितपणे मांडीला मांडी लावून मिसळ खाताना दिसली आणि हेचफोटो समाज माध्यमांमध्ये प्रचंड व्हायरल होऊन ट्रोल झाले यावर मात्र कार्यकर्त्यांनी मिसळ पार्टीच आयोजनकरत सर्वपक्षीय नेत्यांना आम्हीही कायमचे दुश्मन नाही असा थेट इशारा दिलाय..

Body:नाशिक मिसळ आणि त्या ठिकाणी होणाऱ्या वेगळ्या चर्चा या सर्वश्रुत आहेत त्यात भर पडली होती ती निवडणूकी नंतरच्या सर्वपक्षीय उमेदवार आणि नेते मंडळीच्या मिसळपार्टीची.. आरोप-प्रत्यारोप हे निवडणुकीपुरते मर्यादित असतात त्यानंतर शहराच्या विकासासाठी आणि नातेसंबंध जोडण्यासाठी आम्ही एकत्र आल्याचं सांगितलं होतं मात्र या पार्टीचे फोटो समाज माध्यमांवर प्रचंड व्हायरल झाले आणि ट्रोलही... झाले अक्षरश: गुलाल उधळण्यासाठी भाड्याने कार्यकर्ते आना असा गुमजाव कार्यकर्ते करत होते याशिवाय राजकारण कुणी कुणाचा कायमचा शत्रू नसतो असं नेहमीच नेत्यांकडून म्हटलं जातं मात्र हे कार्यकर्त्यांमध्ये कधी पाहायला मिळत नाही मात्र नाशिक मधील कार्यकर्त्यांनी एक नवीन ट्रेंड सुरू केलाय.प्रगल्भ मिसळ पार्टीचा.आयोजक शाम गोहाड यानी बोलताना सागितले..

Conclusion: नेत्यांनो कार्यकर्ते देखील काही कमी नाही तुम्ही जसे सोयीनुसार एकत्र येतात तसे आम्ही देखील एकत्र येऊ शकतो असा इशारा थेट नाशिक मधील कार्यकर्त्यांनी दिलाय.. मिसळ पार्टीला कार्यकर्त्यांचा नेत्यांना पडलेला विसर यासाठी कार्यकर्त्यांनी मिसळ पार्टीतून चोख प्रत्युत्तर दिलंय नेत्यांना कोणता झेंडा घेऊ असे म्हणणाऱ्या कार्यकर्त्यांनी एकत्र येत प्रगल्भ मिसळ पँटर्न सुरू केलाय. तर तर्रीदार मिसळीवर ताव मारत आमच्या शिवाय नेते पुढे कसे जाणार असा सवाल उपस्थित करत नेते मंडळींना दणका दिलाय..
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.