ETV Bharat / state

Ajit Pawar on Hoarding : ...म्हणून आम्ही यशवंतराव चव्हाण यांचा फोटो वापरण्याचा निर्णय घेतला; अजित पवारांचं स्पष्टीकरण - photo of late Yashwantrao Chavan

Ajit Pawar On Hoarding : उपमुख्यमंत्री अजित पवार शनिवारी नाशिक जिल्हा दौऱ्यावर होते. दिवंगत यशवंतराव चव्हाण यांचा फोटो वापरण्याचा निर्णय का घेतला? याबाबत अजित पवार यांनी स्पष्टीकरण दिलंय. तसंच यापुढेही त्यांचा फोटो वापरणार असल्याचंही त्यांनी सांगितलं.

Ajit pawar on hoarding
उपमुख्यमंत्री अजित पवार
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 8, 2023, 7:48 PM IST

उपमुख्यमंत्री अजित पवार

नाशिक : Ajit Pawar on Hoarding : 'माझा फोटो वापरू नये, नाहीतर मी कोर्टात जाईल' असं शरद पवार म्हणाले होते. दुसरीकडं सुसंकृत महाराष्ट्र कसा असावा याचा आदर्श यशवंतराव चव्हाण यांनी आमच्या समोर ठेवला आहे, त्यांचा वारसा घेऊन आम्ही पुढे चाललो आहे. त्यामुळं त्यांचा आदर्श घेण्यासाठी आम्ही यापुढं त्यांचा फोटो वापरण्याचा निर्णय घेतला असल्याचं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केलं आहे.

कांदा फेक झाली नाही : माझ्या नाशिकच्या दौऱ्यात कांदा कोणी माझ्या समोर फेकला नाही, असं असतं तर मी थांबलो असतो आणि त्यांच्याशी चर्चा केली असती, मी माहिती घेतली, ते आंदोलन करणारे आमचे जुने लोक होते. कांदा निर्यात प्रश्नाबाबत आमचा प्रयत्न चालू आहे, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री पण दिल्लीला गेले होते. पियुष गोयल यांच्या उपस्थितीत बैठक झाली, तो विषय केंद्राच्या अखत्यारीत आहे, पण लवकरच त्याच्यावर सकारात्मक निर्णय होईल, असं उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले.

तज्ज्ञ वकिलांचा सल्ला घेऊ : प्रत्येकाला आरक्षण मागण्याचा अधिकार आहे. मराठा समाजाला मागे आरक्षण दिले होते. पण ते न्यायालयात टिकले नाही. पुन्हा काही सहकारी मित्र ओबीसीबाबत काही मागण्या करत आहेत. मराठा आरक्षणाबाबत तज्ज्ञ वकिलांचा सल्ला घेऊ आणि मार्ग काढू, असं अजित पवार यांनी सांगितलं.

जातीनिहाय जनगणनेबाबत विचार सुरू : जातीनिहाय जनगणनेबाबत आम्ही सरकारमध्ये असतांना विधानसभेच्या अध्यक्षांनी तसा प्रस्ताव मांडला होता, तो एकमतानं मंजूर झाला होता. केंद्राची मदत न घेता बिहारनं जनगणना केली. बिहारसारखे राज्य करू शकते तर महाराष्ट्र का करू शकत नाही? हे खर्चिक आहे, पण समाजातील सर्व घटकांना कळलं पाहिजे कोण किती आहे, आमचं सरकार याबाबत विचार करेल, असं अजित पवार यांनी म्हटलं.

हेही वाचा :

  1. Rohit Pawar on Ajit Pawar : ज्या बापानं मुलांसाठी घर बांधलं, खाऊ घातलं, मोठं केलं...; पुतण्याचा काकावर हल्लाबोल
  2. Ajit Pawar in Nashik : उपमुख्यमंत्री अजित पवार सप्तशृंगी मातेच्या चरणी नतमस्तक
  3. Ajit Pawar Banner In Nashik: नाशिकमध्ये अजित पवार यांच्या बॅनरवरून दिवंगत यशवंतराव चव्हाण 'इन' आणि शरद पवार 'आउट'

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.