ETV Bharat / state

ऑनलाइन महासभेत नगरसेवक संतोष गायकवाड यांनी खड्यात बसून नोंदवला सहभाग..! - नाशिक रस्ते खड्डे समस्या

शहरात पडलेल्या खड्ड्यांकडे लक्ष वेधण्यासाठी नगरसेवक संतोष गायकवाड यांनी मंगळवारी झालेल्या ऑनलाइन महासभेत खड्ड्यांमध्ये बसून आंदोलन करत सहभाग नोंदवला. खड्डे बुजवण्यात आले नाहीत, तर जन आंदोलन छेडण्याचा इशारा यावेळी देण्यात आला.

नाशिक
नाशिक
author img

By

Published : Sep 16, 2020, 5:49 AM IST

नाशिक - महापौरांनी आदेश देऊनही नाशिक शहरातील खड्डे बुजवण्यात आले नसल्याने या खड्ड्यांकडे लक्ष वेधण्यासाठी नगरसेवक संतोष गायकवाड यांनी मंगळवारी झालेल्या ऑनलाइन महासभेत खड्ड्यांमध्ये बसून आंदोलन करत सहभाग नोंदवला. येत्या महिनाभरात शहरासह सातपूर प्रभागातील खड्डे प्रामुख्याने बुजवण्यात आले नाहीत, तर जन आंदोलन छेडण्याचा इशारा त्यांनी यावेळी दिला.

एकीकडे नाशिक शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर होत आहे. यामुळे नाशिककर हैराण झाले असतानाच दुसरीकडे शहरात असलेल्या खड्ड्यांमुळे सर्वसामान्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर महापौर सतीश कुलकर्णी यांनी शहरातील खड्डे तातडीने बुजवण्यात यावे, असे आदेश संबंधित प्रशासनाला दिले होते. मात्र, याला महिनाभराचा कालावधी उलटून देखील शहरातील खड्डे बुजविण्यात आले नसल्याचे पाहायला मिळते. या खड्यांकडे लक्ष वेधण्यासाठी नगरसेवक संतोष गायकवाड यांनी मंगळवारी झालेल्या ऑनलाइन महासभेत सातपूर भागातील खड्ड्यांमध्ये बसून सहभाग नोंदवला. तसेच हे खड्डे येत्या महिनाभरात बुजवण्यात आले नाही तर तीव्र पद्धतीचे जनआंदोलन छेडण्याचा इशारा गायकवाड यांनी दिला.

हेही वाचा - कांदा निर्यातबंदीच्या विरोधात शेतकऱ्यांचा रास्तारोको

दरम्यान, शहरात असलेल्या खड्यांकडे लक्ष वेधण्यासाठी शेवटी स्थानिक लोकप्रतिनिधींना खड्ड्यात बसून आंदोलन करावे लागत आहे. यामुळे आतातरी संबंधित प्रशासनाने याचे गांभीर्य ओळखून हे खड्डे तातडीने बुजवावेत आणि नागरिकांच्या जीवाशी होत असलेला खेळ थांबवावा, अशी मागणी स्थानिक नागरिकांनी यावेळी केली.

नाशिककरांच्या तक्रारींची दखल न घेतल्यामुळे नगरसेवकांनी केलेल्या आंदोलनाची दखल घेऊन महापौर आणि संबंधित प्रशासन नाशिककरांसाठी धोकादायक ठरत असलेले खड्डे आतातरी बुजवणा का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

हेही वाचा - 'शेतकऱ्याच्या कांद्याला भाव मिळत असल्याचे पाहून केंद्र सरकारला पोटशूळ'

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.