ETV Bharat / state

कर्जमाफीचा लाभ सर्व शेतकऱ्यांना मिळावा, प्रशासनाने याची खबरदारी घ्यावी' - महाविकास आघाडी

मागील सरकारने केलेल्या कर्जमाफीच्या दरम्यान नाशिक जिल्ह्यामध्ये ६५० कोटी कर्ज माफी दिली होती. मात्र, प्रत्यक्षात २५० कोटी रुपये वाटप केले गेले. याबाबत आपण स्वत: विधानसभेत आवाज उठवला होता, असे छगन भुजबळ यांनी म्हटले आहे.

Chhagan Bhujbal
छगन भुजबळ
author img

By

Published : Dec 26, 2019, 10:16 AM IST

नाशिक - महाविकास आघाडीच्या सरकारने केलेल्या कर्जमाफीचा लाभ राज्यातील सर्व शेतकऱ्यांना व्हावा. प्रशासनाने यासाठी योग्य ती खबरदारी घ्यावी, असे मंत्री छगन भुजबळ यांनी म्हटले आहे. मागील सरकारने केलेल्या कर्जमाफीच्या दरम्यान नाशिक जिल्ह्यामध्ये ६५० कोटी कर्ज माफी दिली होती. मात्र, प्रत्यक्षात २५० कोटी रुपये वाटप केले गेले. याबाबत आपण स्वत: विधानसभेत आवाज उठविला होता. त्यामुळे यावेळी कर्जमाफीचा लाभ शेवटच्या शेतकऱ्यांपर्यंत मिळावा, यासाठी जिल्हा प्रशासनाला खबरदारी घेण्याच्या सूचना दिल्या आहेत, अशी माहिती राज्याचे ग्रामविकास मंत्री छगन भुजबळ यांनी दिली.

शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळावा यासाठी प्रशासनाने खबरदारी घ्यावी - छगन भुजबळ

हेही वाचा... मोदींनी केली वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त अटल भूजल योजनेची घोषणा

छगन भुजबळ हे बुधवारी नाशिक जिल्हा दौऱ्यावर आले असताना त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. भुजबळ यांनी बुधवारी नाशिक शहर व जिल्ह्यातील विविध प्रश्नासंदर्भात विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी व मनपा आयुक्तांसमवेत प्रश्न जाणून घेतले आहे. यावेळी बोलताना छगन भुजबळ म्हणाले, कर्जमाफी योजनेत राज्यातील ३० लाख ५७ हजार शेतकऱ्यांना एकूण २१ हजार २१६ कोटी रुपयांची कर्जमाफी द्यावी लागेल. त्याचप्रमाणे नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी तसेच २ लाखांपेक्षा अधिक कर्ज असणाऱ्या शेतकऱ्यांसाठी वेगळी योजना आखली जात असल्याचे त्यांनी सांगितले.

हेही वाचा... मुंबईत पुन्हा बरसल्या सरी; नागरिकांच्या नाताळाच्या उत्साहावर पाणी

शिवभोजन योजनेअंतर्गत कोणत्याही प्रकराची जागा ही संस्थांना दिली जाणार नाही. कारण याबाबतचा मागचा अनुभव चांगला नाही. ही बचतगटांना प्राधान्याने दिली जातील. सुमारे ५०० नागरिकांना जेवण देणे बंधनकारक असणार आहे. यासाठी शहरी भागात ४० रुपये तर ग्रामीण भागात २५ रुपये अनुदान सरकार मार्फत दिले जाईल. या योजनेच्या देखरेखीसाठी वेगळे पथक देखील तयार करण्यात येईल, असे भुजबळ यांनी सांगितले.

हेही वाचा... बीडमध्ये राजकारण पेटलं; विनायक मेटेंनी घरात घुसून धमकावल्याचा पं. स. सदस्याच्या दिराचा आरोप

राज्यमंत्रिमंडळाच्या विस्ताराबाबत भुजबळ यांना विचारले असता, राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार येत्या ३० डिसेंबरला होणार आहे. मंत्रिमंडळ विस्तारावरून महाघाडीतील कोणत्याही पक्षात मतभेद नाही. उपमुख्यमंत्री, गृहमंत्री बाबतच्या ज्या चर्चा आहेत. या केवळ वृत्तपत्रामधून होत आहेत. त्यामुळे ३० तारखेला मंत्रिमंडळ विस्तार आणि त्यानंतर खातेवाटप केले जाईल, असे त्यांनी यावेळी सांगितले.

हेही वाचा... मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणजे शरद पवारांच्या हातातील कठपुतळी - निलेश राणे

नाशिक शहरात स्मार्ट सिटी अंतर्गत सुरू असलेल्या प्रकल्पांबाबत भुजबळ यांना विचारले असता, त्यांनी अशा प्रकल्पांची शहराला आवश्यकता किती, तिची उपयुक्तता किती याचा अभ्यास करणे आवश्यक असल्याचे म्हटले आहे. तसेच याकरिता शहरातील या क्षेत्रातील तज्ञांची मते देखील जाणून घेणे आवश्यक आहे. कारण नागपूर शहरामध्ये मेट्रो प्रकल्प राबवला गेला. मात्र त्याचे काम अर्धवट स्थितीत आहे. ज्या काही मार्गावर मेट्रो सुरु आहे. त्या मार्गावर मोजकेच प्रवासी याचा लाभ घेतांना दिसतात. त्यामुळे शहराच्या वाहतुकीचा बोजवारा उडाला आहे. त्यामुळे कोणतेही प्रकल्प राबवले जात असताना इतर शहरांचा अभ्यास करून, ते राबवले जावेत असे त्यांनी सांगितले. अजित पवारांच्या क्लीन चीट बाबत भुजबळ यांनी, हे प्रकरण न्यायालयात आहे. त्यामुळे न्यायप्रविष्ट प्रकरणात हस्तक्षेप करणे योग्य होणार नाही असे स्पष्ट केले.

Intro:मागील कर्जमाफीच्या दरम्यान नाशिक जिल्ह्यामध्ये ६५० कोटी कर्ज माफी दिली गेली. मात्र प्रत्यक्षात २५० कोटी रुपये वाटप केले होते. याबाबत आपण स्वत: विधानसभेत आवाज उठविला होता. त्यामुळे यंदाच्या कर्जमाफी योजनेचा शेतकऱ्यांपर्यंत लाभ मिळावा यासाठी जिल्हा प्रशासनाला खबरदारी घेण्याच्या सूचना दिलेल्या असल्याची माहिती राज्याचे ग्रामविकास मंत्री ना.छगन भुजबळ यांनी दिली. आज नाशिक जिल्हा दौऱ्यावर असतांना त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते. ना.छगन भुजबळ यांनी आज नाशिक शहर व जिल्ह्यातील विविध प्रश्नांसंदर्भात विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी व मनपा आयुक्तांसमवेत प्रश्न जाणून घेतले आहे. Body:यावेळी बोलतांना ना. छगन भुजबळ म्हणाले की, कर्जमाफी योजनेत राज्यातील ३० लाख ५७ हजार शेतकऱ्यांना एकूण २१ हजार २१६ कोटी रुपयांची कर्जमाफी द्यावी लागेल. त्याचप्रमाणे नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी तसेच २ लाखांपेक्षा अधिक कर्ज असणाऱ्या शेतकऱ्यांसाठी वेगळी योजना आखली जात असल्याचे त्यांनी संगितले. तसेच शिवभोजन योजनेअंतर्गत कोणत्याही प्रकराची जागा ही संस्थाना दिली जाणार नाही. कारण याबाबतचा मागचा अनुभव चांगला नाही. ही बचतगटांना प्राधान्याने दिली जातील. सुमारे ५०० नागरिकांना जेवण देणे बंधनकारक असणार आहे. यासाठी शहरी भागात ४० रुपये तर ग्रामीण भागात २५ रुपये अनुदान सरकार मार्फत दिले जाईल. या योजनेच्या देखरेखीसाठी वेगळे पथक देखील तयार करण्यात येईल असे त्यांनी सांगितले.

Conclusion:राज्यमंत्रीमंडळाच्या विस्ताराबाबत ते म्हणाले की, राज्यमंत्रीमंडळाचा विस्तार येत्या ३० तारखेला होणार आहे. मंत्रीमंडळ विस्तारावरून महाघाडीतल्या कोणत्या पक्षात मतभेद नाही. उपमुख्यमंत्री, गृहमंत्री बाबतच्या ज्या चर्चा आहेत. या केवळ वृत्तपत्रामधून होत आहेत. त्यामुळे ३० तारखेला विस्तारानंतर खातेवाटप त्याच दिवशी केले जाईल असे त्यांनी सांगितले.

नाशिक शहरातील स्मार्ट सिटी अंतर्गत सुरु असलेल्या प्रकल्पांबाबत बोलतांना ते म्हणाले की, त्या प्रकल्पांची शहराला आवश्यकता किती, तिची उपयुक्तता किती याचा अभ्यास करणे आवश्यक आहे. याकरिता शहरातील या क्षेत्रातील तज्ञांची मते देखील जाणून घेणे आवश्यक आहे. कारण नागपूर शहरामध्ये मेट्रो प्रकल्प राबविला गेला. मात्र त्याचे काम अर्धवट स्थितीत आहे. ज्या काही मार्गावर मेट्रो सुरु आहे. त्या मार्गावर मोजकेच प्रवासी याचा लाभ घेतांना दिसतात. त्यामुळे शहराच्या वाहतुकीचा बोजवारा उडाला आहे. त्यामुळे कुठल्याही विकासाला माझा विरोध नाही परंतु कोणतेही प्रकल्प राबविले जात असताना इतर शहरांचा अभ्यास करून ते राबविले जावेत असे त्यांनी सांगितले. तसेच अजित पवारांच्या क्लीन चीट बाबत बोलतांना ते म्हणाले की, हे प्रकरण न्यायालयात आहे. त्यामुळे न्यायप्रविष्ट प्रकरणात हस्तक्षेप करणे योग्य होणार नाही असे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.