ETV Bharat / state

Aditya Thackeray Visit to Ayodhya : राज ठाकरेंच्या आधीच अयोध्येत आदित्य ठाकरे बाजी मारणार? नाशिकच्या शिवसैनिकांकडे नियोजन - नाशिक लेटेस्ट न्यूज

प्रभू रामचंद्रांची जन्मभूमी असलेल्या आयोध्येत 10 जूनला आदित्य ठाकरे हे दौरा ( Aditya Thackeray visit to Ayodhya ) करणार असल्याचं म्हटलं जातं असतांना मनसे अध्यक्ष राज ठाकरे ( MNS president Raj Thackeray ) यांनी आपल्या दौऱ्याची 5 जून तारीख जाहीर केली. परंतु आता राज ठाकरे यांच्या आधीच 1 जूनला आदित्य ठाकरे आयोध्येत दाखल होतील अशी शक्यता वर्तवली जात आहे.

Ayodhya
Ayodhya
author img

By

Published : May 10, 2022, 9:49 PM IST

नाशिक: हिंदुत्वाच्या मुद्द्यावर शिवसेना आणि मनसे समोरासमोर उभे ठाकले आहे, प्रभू रामचंद्रांची जन्मभूमी असलेल्या आयोध्येत 10 जूनला आदित्य ठाकरे हे दौरा ( Aditya Thackeray visit to Ayodhya ) करणार असल्याचं म्हटलं जातं असतांना मनसे अध्यक्ष राज ठाकरे ( MNS president Raj Thackeray ) यांनी आपल्या दौऱ्याची 5 जून तारीख जाहीर केली. परंतु आता राज ठाकरे यांच्या आधीच 1 जूनला आदित्य ठाकरे आयोध्येत दाखल होतील अशी शक्यता वर्तवली जात आहे. यासाठी नाशिकच्या शिवसेना पदाधिकाऱ्यांनी गुपचुप अयोध्येत जाऊन पाहणी दौरा केला आहे. अर्थात हा दौरा गोपनीय असून त्यांची कोणतीही माहिती बाहेर जाणार नाही याची काळजी व सूचना देण्यात आल्या आहेत.

राज्याचे राजकारण सध्या हिंदुत्ववादामुळे ढवळून निघाले आहे. तसेच राज ठाकरे यांनी हिंदुत्वाचा मुद्दा उचलल्यानंतर याच दरम्यान आदित्य ठाकरे ( Environment Minister Aditya Thackeray ) अयोध्येला जाणार असल्याचे जाहीर झाले आहे. राज ठाकरे ( Raj Thackeray visit to Ayodhya )यांनी 5 जून तर आदित्य ठाकरे यांनी 10 जूनला अशा तारखा जाहीर झाल्या केल्या होत्या, मात्र आता आदित्य ठाकरे यांचे दौऱ्याचे नियोजन करणाऱ्या, नाशिकच्या शिवसैनिकांनी मात्र दौऱ्याची तारीख निश्चित नाही असं म्हटलंय, त्यामुळे राज ठाकरे यांच्या अगोदरच आदित्य ठाकरे आयोध्येत जाऊन बाजी मारतात का हा प्रश्न निर्माण झाला आहे.

नाशिककडे नियोजन - आदित्य ठाकरे यांच्या दौऱ्याचे नियोजन नाशिककडे देण्यात आले आहे. तसेच यासाठीच नाशिकहून शिवसेनेचे संपर्कप्रमुख भाऊसाहेब चौधरी, आमदार सुहास कांदे, उपनेते सुनील बागुल,महानगर प्रमुख सुधाकर बडगुजर, माजी जिल्हाप्रमुख दत्ता गायकवाड, विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते, माजी महापौर विनायक पांडे, माजी गटनेते विलास शिंद, यांनी चार मे दरम्यान आयोध्यात भेट देऊन पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या दौऱ्याच्या दृष्टीने पाहणी करून नियोजन केले आहे.

काय आहे कार्यक्रम - आदित्य ठाकरे हे रामलल्लाचे दर्शन घेतील, तसेच शरयूकाठी आरती करतील आणि त्याचबरोबर पत्रकार परिषद घेणार असल्याचं सांगण्यात येत आहे. आदित्य ठाकरे यांच्या या दौऱ्याला नाशिकहून शेकडो शिवसैनिक जाणार असल्याचं सांगण्यात येत आहे.

हेही वाचा - Nashik Road Central Jail : पॅरोलवर असणाऱ्या 800 कैद्यांना जेलमध्ये परतण्याचे आदेश

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.