ETV Bharat / state

Aishwarya Rai Bachchan Notice : अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चनला सिन्नर तहसीलदारांनी पाठविली नोटीस; हे आहे कारण...

प्रसिद्ध अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चनला सिन्नर तहसीलदारांनी नोटीस बजावली आहे. सिन्नरमधील जमिनीचा 22 हजार रुपयांचा कर थकवल्याप्रकरणी त्यांना ही नोटीस बजावण्यात आली आहे. नाशिक जिल्ह्यातील सिन्नरमधील ठणगावजवळ आडवाडीच्या डोंगराळ भागात ऐश्वर्याची सुमारे 1 हेक्टर 22 आर जमीन आहे. याच जमिनीचे एक वर्षाचे कर ऐश्वर्याने थकवल्याची माहिती समोर येत आहे.

Actress Aishwarya Rai Bachchan get notice
अभिनेत्री ऐश्वर्या राय नोटीस
author img

By

Published : Jan 17, 2023, 10:23 AM IST

Updated : Jan 17, 2023, 10:31 AM IST

नाशिक : अभिनेत्री ऐश्वर्यासोबतच इतरही 1200 मालमत्ता धारकांना कर थकवल्याप्रकरणी नोटीस बजावण्यात आली आहे. मार्च महिन्याच्या अखेरपर्यंत कर वसुलीचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी महसूल विभागाकडून ही कारवाई करण्यात आली आहे. मार्च महिन्याच्या अखेर पर्यंत करू वसुलीचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी महानगरपालिका, तहसील कार्यालय थकीत करदात्यांना नोटीसा काढल्या जातात,याचाच एक भाग म्हणूनसिन्नर तहसीलला मालमत्ताधारकांकडून वर्षाकाठी 1.11 कोटींचा महसूल अपेक्षित आहे. त्यापैकी 65 लाखांची वसुली अद्याप बाकी आहे. मार्च अखेरपर्यंत वसुलीचे हे उद्दिष्ट असल्याने महसूल विभागाने हे पाऊल उचलले आहे.

ऐश्वर्या रायसह यांनाही पाठविण्यात आली नोटीस ऐश्वर्या रायसह इतर थकबाकीदारांमध्ये गम प्रायव्हेट लिमिटेड, एल. बी. कुंजीर इंजीनिअर, आयटीसी मराठा लिमिटेड, एस. के. शिवराज, हॉटले लीला व्हेंचर लिमिटेड, कुकरेजा डेव्हलपेंट कॉर्पोरेशन, रामा हँडिक्राफ्ट, ओपी एंटरप्रायझेस कंपनी गुजरात बिंदू वायू ऊर्जा लिमिटेड,एअर कंट्रोल प्रायव्हेड लिमिडेट, मेटकॉन इंडिया प्रायव्हेट लिमिडेट, छोटाभाई जेठाभाई पटेल अँड कंपनी, राजस्थान यांचा समावेश आहे.

जगातील सर्वात सुंदर स्त्री म्हणून आहे ऐश्वर्याची ओळख अभिनेत्री आणि माजी मिस वर्ल्ड ऐश्वर्या राय बच्चन ही लोकप्रिय अभिनेत्री आहे. अभिनेत्री ऐश्वर्याने 1994 मध्ये मिस वर्ल्ड स्पर्धा जिंकली. त्यानंतर तिने और प्यार हो गया या चित्रपटातून 1997 मध्ये बॉलिवूड पदार्पण केले. तिने 'देवदास'च्या पारोपासून ते 'हम दिल दे चुके'ची नंदिनी ते 'मोहोब्बतें'तील मेघापर्यंत, सहज सुंदर अभिनय आणि अलौकिक सौंदर्याच्या जोरावर बॉलिवूडवर राज्य केले आहे. तिला अनेकवेळा 'जगातील सर्वात सुंदर स्त्री' म्हणून औळखले जाते. और प्यार हो गया चित्रपटापासून ऐश्वर्या प्रेक्षकांच्या मनावर आधिराज्य गाजवत आली आहे. हम दिल दे चुके सनम, ताल, देवदास आणि जोधा अकबर हे तिचे काही उल्लेखनीय चित्रपट आहेत. तिचा अभिनयाचा प्रवास केवळ बॉलीवूडपुरता मर्यादित राहिला नाही कारण तिने हॉलीवूडमध्ये ब्राइड अँड प्रिज्युडिस, प्रोव्होक्ड, यासह इतर काही चित्रपटात उल्लेखनीय भूमिका साकारल्या आहेत.

कान्स फिल्म फेस्टीव्हलमधील पहिली ज्यूरी 2007 मध्ये, तिने सहकलाकार अभिनेता अभिषेक बच्चनशी लग्न केल्यानंतर लगेचच त्यांचा 'गुरु' हा चित्रपट यशस्वी झाला होता. चार वर्षांनंतर अभिषेक आणि ऐश्वर्या या जोडप्याला आराध्या ही पहिले मूलगी झाली. निळ्या डोळ्यांच्या या सौंदर्यवतीचे स्क्रीन आणि रेड कार्पेटला नेहमीच आकर्षण राहिले आहे. 2003 मध्ये पार पडलेल्या कान्स फिल्म फेस्टीव्हलमध्ये ज्यूरी म्हणून काम करणारी ती पहिली भारतीय होती.

Last Updated : Jan 17, 2023, 10:31 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.