नाशिक: मार्च महिन्याच्या अखेर पर्यंत कर वसुलीचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी महानगरपालिका, तहसील कार्यालय थकीत करदात्यांना नोटीस पाठवत असतात.,याचाच एक भाग म्हणून सिन्नर तहसीलने मालमत्ताधारकांना नोटिस पाठवलेल्या आहेत. तहसीलला वर्षाकाठी 1.11 कोटींचा महसूल अपेक्षित आहे. त्यापैकी 65 लाखांची वसुली अद्याप बाकी आहे. मार्च अखेरपर्यंत वसुलीचे हे उद्दिष्ट असल्याने महसूल विभागाने पाठवलेल्या नोटीस मधे अभिनेत्री ऐश्वर्या सोबतच इतर 1200 मालमत्ता धारकांना कर थकवल्याप्रकरणी नोटीस बजावण्यात आली.
ऐश्वर्या रायसह इतर थकबाकीदारांमध्ये गम प्रायव्हेट लिमिटेड, एल. बी. कुंजीर इंजीनिअर, आयटीसी मराठा लिमिटेड, एस. के. शिवराज, हॉटले लीला व्हेंचर लिमिटेड, कुकरेजा डेव्हलपेंट कॉर्पोरेशन, रामा हँडिक्राफ्ट, ओपी एंटरप्रायझेस कंपनी गुजरात बिंदू वायू ऊर्जा लिमिटेड,एअर कंट्रोल प्रायव्हेड लिमिडेट, मेटकॉन इंडिया प्रायव्हेट लिमिडेट, छोटाभाई जेठाभाई पटेल अँड कंपनी, राजस्थान आदींचा समावेश आहे. मार्च महिन्याच्या अखेरपर्यंत कर वसुलीचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी महसूल विभाग अशी कारवाई करत असते. ऐश्वर्याच्या नोटीसची बातमी माध्यमांत चांगलीच गाजली दरम्यान सिन्नरचे तहसीलदार एकनाथ बांगले यांना संदर्भात विचारले असता त्यांनी सांगितले की, त्यांना नोटीस मिळाल्या नंतर त्यांनी तीसऱ्या दिवशी धनादेशाच्या माध्यमातुन कर भरला आहे
अभिनेत्री आणि माजी मिस वर्ल्ड ऐश्वर्या राय बच्चन ही लोकप्रिय अभिनेत्री आहे. जगातील सर्वात सुंदर स्त्री म्हणून तीची ओळख आहे अभिनेत्री ऐश्वर्याने 1994 मध्ये मिस वर्ल्ड स्पर्धा जिंकली. त्यानंतर तिने और प्यार हो गया या चित्रपटातून 1997 मध्ये बॉलिवूड पदार्पण केले. तिने 'देवदास'च्या पारोपासून ते 'हम दिल दे चुके'ची नंदिनी ते 'मोहोब्बतें'तील मेघापर्यंत, सहज सुंदर अभिनय आणि अलौकिक सौंदर्याच्या जोरावर बॉलिवूडवर राज्य केले आहे. तिला अनेकवेळा 'जगातील सर्वात सुंदर स्त्री' म्हणून औळखले जाते. और प्यार हो गया चित्रपटापासून ऐश्वर्या प्रेक्षकांच्या मनावर आधिराज्य गाजवत आली आहे. हम दिल दे चुके सनम, ताल, देवदास आणि जोधा अकबर हे तिचे काही उल्लेखनीय चित्रपट आहेत. तिचा अभिनयाचा प्रवास केवळ बॉलीवूडपुरता मर्यादित राहिला नाही कारण तिने हॉलीवूडमध्ये ब्राइड अँड प्रिज्युडिस, प्रोव्होक्ड, यासह इतर काही चित्रपटात उल्लेखनीय भूमिका साकारल्या आहेत.
कान्स फिल्म फेस्टीव्हलमधील पहिली ज्यूरी 2007 मध्ये, तिने सहकलाकार अभिनेता अभिषेक बच्चनशी लग्न केल्यानंतर लगेचच त्यांचा 'गुरु' हा चित्रपट यशस्वी झाला होता. चार वर्षांनंतर अभिषेक आणि ऐश्वर्या या जोडप्याला आराध्या ही पहिले मूलगी झाली. निळ्या डोळ्यांच्या या सौंदर्यवतीचे स्क्रीन आणि रेड कार्पेटला नेहमीच आकर्षण राहिले आहे. 2003 मध्ये पार पडलेल्या कान्स फिल्म फेस्टीव्हलमध्ये ज्यूरी म्हणून काम करणारी ती पहिली भारतीय होती.
हेही वाचा : Abhishek - Shivalika wedding : दृश्यम 2 चा दिग्दर्शक अभिषेक पाठकचा शिवालिका ओबेरॉयसोबत विवाह