ETV Bharat / state

शेतकऱ्यांना कर्ज न दिल्यास बँकांवर कारवाई - अनिल बोंडे - जिल्हा बँक

बियाण्यांची भेसळ करून विकणाऱ्या व्यापाऱ्यांविरोधात तक्रार दाखल करून सक्त कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे कृषिमंत्री अनिल बोंडे यांनी दिली.

शेतकऱ्यांना कर्ज न दिल्यास बँकांवर कारवाई - अनिल बोंडे
author img

By

Published : Jul 2, 2019, 9:42 PM IST

नाशिक - जिल्हा बँक शेतकऱ्यांना कर्ज देण्यास कोणत्याही कारणासाठी अडचण आणत असेल तर, अशा बँकाविरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश सरकारने दिले आहेत. तसेच बियाण्यांची भेसळ करून विकणाऱ्या व्यापाऱ्यांविरोधात तक्रार दाखल करून सक्त कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे कृषिमंत्री अनिल बोंडे यांनी दिली.

दिवंगत माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या जयंती दिनानिमित्त कृषी दिन कार्यक्रमाचे जिल्हा परिषदेच्या रावसाहेब थोरात सभागृहात आयोजन करण्यात आले होते. यावेळी बोंडे बोलत होते.

शेतकऱ्यांना कर्ज न दिल्यास बँकांवर कारवाई - अनिल बोंडे

यावेळी बोलताना बोंडे म्हणाले, शेतकऱ्यांनी अधिकृत दुकानातूनच बियाणे-खते पावतीसह घ्यावीत. त्याबरोबरच प्रत्येक शेतकऱ्याने आपल्या पिकाचा विमा काढावा.

शेतकऱ्यांनी एकत्र येऊन गटशेती करणे आवश्यक आहे. यासाठी मुख्यमंत्र्यांनी जे शेतकऱ्यांचे गट एकत्र येतील त्यांना 1 ते 10 कोटी रुपयांपर्यंत अनुदान देण्याचा निर्णय घेतला आहे. याचा फायदा शेतकऱ्यांनी घेऊन शेततळे बांधून शेती करावी, असे आवाहनही त्यांनी केले. प्रत्येक शेतकऱ्याने आपल्या शेतमालाचा विमा काढावा, यासाठी विमा कंपन्यांचे अधिकारी जिल्हा अधीक्षक कार्यालयात थांबणार आहेत. तर यापुढे ते तालुक्याच्या ठिकाणी कृषी कार्यालयात बसतील, अशी व्यवस्था करण्यात येणार असल्याचे बोंडे यांनी सांगितले.

Intro:जिल्हा बँक शेतकऱ्यांना शेती कर्ज देण्यास आणि इतर कुठल्याही कारणास्तव अडचणी आणत असतील तर अशा बँकाविरोधात एफआयआर दाखल करण्याचे आदेश सरकारने दिले आहेत शेतकऱ्यांनी अधिकृत दुकानातूनच बियाणे खते पावती सह घ्यावे बियाण्यांची भेसळ करून विकणाऱ्या व्यापार्‍यांच्या विरोधात तक्रारी दाखल करून त्यांच्यावर सक्त कारवाई करण्यात येणार असल्यासच प्रतिपादन राज्याचे कृषिमंत्री अनिल बोंडे यांनी कले

Body:प्रत्येक शेतकऱ्याने आपल्या पिकाचा विमा काढावा असे आवाहन राज्याचे कृषिमंत्री अनिल बोंडे यांनी केलेय..दिवंगत वसंतराव नाईक माजी मुख्यमंत्री यांच्या जयंती दिनानिमित्त कृषी दिन कार्यक्रमाचे आयोजन जिल्हा परिषदेच्या रावसाहेब थोरात सभागृहात करण्यात आले होते त्यावेळेस ते बोलत होते

Conclusion:शेती शेतकऱ्यांनी शेती पूरक व्यवसाय करावा शेतकऱ्यांनी एकत्र यावे व शेती गट करणे आवश्यक आहे यासाठी मुख्यमंत्र्यांनी जे शेतकऱ्यांचे गट एकत्र येतील त्यांना एक ते दहा कोटी रुपयांपर्यंत अनुदान देण्याचा निर्णय घेतला आहे याचा फायदा शेतकऱ्यांनी घेऊन शेततळे बांधून शेती करावी असे आवाहनही त्यांनी केले कृषी सहायकास ग्रामपंचायतीत हक्काचे कार्यालय मिळावे अशी सोय शासन करून देणार आहे यासाठी कृषी सहायकाची मोबाईलवर हजेरी घेतली जाणार आहे प्रत्येक शेतकऱ्याने आपल्या शेतमालाचा शेत पिकाचा विमा काढावा यासाठी विमा कंपन्यांचे एजंट जिल्हा अधीक्षक कार्यालयात बसणार असून तालुक्याच्या ठिकाणी कृषी कार्यालयात बसेल अशी व्यवस्था यापुढे केली जाणार आहे शेतकऱ्यांच्या पाठीशी शासन ठामपणे उभे आहे पुढेही राहणार असून शेतकऱ्यांचे उत्पन्न 2022 पर्यंत दुप्पट व्हावे शेतकरी आर्थिक दृष्ट्या सक्षम होऊन त्याला सन्मान मिळणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितलय
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.