ETV Bharat / state

नाशिकमध्ये विठ्ठल नामाची शाळा; रांगोळी, बालदिंडी व सांस्कृतिक कार्यक्रमांमुळे वारकऱ्यांमध्ये चैतन्य - कळवण

नाशिक जिल्ह्यातील शहर आणि ग्रामीण भागात आषाढी एकादशी निमित्त विठ्ठल भक्तांचा उत्साह शिगेला पोहचल्याचे पहायला मिळाले. जिल्ह्यात शाळकरी मुलांनी काढलेल्या दिंडीमुळे ठिकठिकाणी विठ्ठल नामाची शाळा भरली होती, तर कलावंतांनी रांगोळीच्या माध्यमातून विठूरायाचे रूप साकारले होते.

नाशिक जिल्ह्यात शहर आणि ग्रामीण भागात आषाढी एकादशीचा उत्साह
author img

By

Published : Jul 12, 2019, 7:06 PM IST

नाशिक - राज्यात आज सर्वत्र विठू नामाचा गजर करत भक्त विठ्ठल भक्तीत तल्लीन झाल्याचे पाहायला मिळत आहे. कळवण शहराचे ग्रामदैवत असलेल्या व शेकडो वर्षांची परंपरा लाभलेल्या प्रतिपंढरपूर श्री विठोबा महाराज मंदिरात आज आषाढी एकादशी निमित्ताने पहाटे ५ वाजेपासून दर्शनासाठी विठ्ठल भक्तांनी गर्दी केल्याने गांधी चौक परिसराला यात्रेचे स्वरूप आले होते.

प्रत्येकालाच पंढरपूरात जाऊन विठू रायाच्या चरणी नतमस्तक होता येत नाही. त्यामुळे जवळपास असलेल्या विठ्ठल मंदिरात विठ्ठल भक्तांची मोठी गर्दी होत असते. आज नाशिक शहर आणि ग्रामीण भागात विठ्ठलाच्या मदिरांत भाविकांची दर्शनासाठी गर्दी केली होती. यावेळी काही ठिकाणी शाळकरी मुलांनी काढलेल्या दिंडीमुळे ठिकठिकाणी विठ्ठल नामाची शाळा भरल्याचे चित्र दिसत होते. तर काही ठिकाणी कलावंतांनी रांगोळी माध्यमातून विठूरायाचे रूप साकारले होते.

नाशिकच्या येवल्यात देखील आषाढी एकादशी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. शहरातील इंग्लिश मिडीयम स्कूल मधील चिमुकल्या मुलांनी विठ्ठल रुक्मिणी यांची वेशभूषा करत शहरातून टाळ मृदुंगाच्या गजरात पायी दिंडी काढली. यावेळी नृत्य सादर करून नृत्याद्वारे या शालेय विद्यार्थ्यांनी वृक्ष लागवडीचा संदेश शहर वासीयांना दिला.

Intro:आज सर्वत्र विठू माऊलीचा नामाचा गजर करत वारकऱ्यांसह विठ्ठल भक्त तल्लीन झाल्याचे पाहायला मिळतंय. प्रत्येकालाच पंढरपूरात जाऊन विठू रायाच्या चरणी नतमस्तक होता येत नाही. त्यामुळे जवळच असलेल्या विठ्ठल मंदिरात विठ्ठल भक्तांनी मोठी गर्दी केल्याचं पाहायला मिळालंय
नाशिक जिल्ह्यातील ग्रामीण भागात एकादशी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली नाशिक शहर आणि ग्रामीण भागात विठ्ठलाच्या मदिरात भाविकांची दर्शनासाठी गर्दी केली होती यावेळी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. शाळकरी मुलांनी काढलेल्या दिंडीमुळे ठिकठिकाणी विठ्ठल नामाची शाळा भरली तर कलावंतांनी रांगोळी रेखाटनाच्या माध्यमातून विठूरायचे रूप साकारले होते. Body:कळवण शहराचे ग्रामदैवत असलेल्या व शेकडो वर्षांची धार्मिक परंपरा लाभलेल्या प्रतीपंढरपूर श्री विठोबा महाराज मंदिरात आज आषाढी एकादशी निमित्ताने पहाटे ५ वाजेपासून विठुरायाच्या दर्शनासाठी विठ्ठल भक्तांनी गर्दी केल्याने व मंदिरात दर्शनासाठी भक्तांच्या रांगा लागल्याने गांधी चौक परिसराला यात्रेचे स्वरूप आले होते.पहाटे विठ्ठलाची महापुजा करण्यात आली.पोलिस निरिक्षक प्रमोद वाघ यांच्यासह विविध शासकीय अधिकारी,पदाधिकाऱ्यांनीही विठ्ठलाचे मनोभावे दर्शन घेतले.
जिल्ह्याच्या विविध भागातून दिंड्या मंदिर परिसरात दाखल झाल्या होत्याConclusion:तसेच येवल्यात ही आषाढी एकादशी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येत असून शहरातील इंग्लिश मिडीयम स्कूल मधील चिमुकल्या मुलांनी पण विठ्ठल रुख्मिणी ची वेशभूषा परिधान करून शहरातून टाळ मृदुंगच्या गजरा पायी दिंडी काढली.या लहान चिमुकल्या मुला व मुलींना या पायी दिंडीत अक्षशा फुगडी खेळत विठू नामा गजर केला तर शहरातून पायी पालखी मिरवणूक काढून नृत्य सादर करून नृत्याद्वारे या शालेय विद्यार्थ्यांनी वृक्ष लागवडीचा संदेश शहर वासियांना दिला..या दींडीत हरी ओम विठ्ठल विठ्ठला या भक्ती गितावर चिमुकल्या विद्यार्थानी सुंदर नृत्य केले.
विठ्ठल मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रम, नगर प्रदक्षिणा, भक्तीफेरी, मंदिरांमध्ये महापूजा, भजन-कीर्तन, विठ्ठल मंदिरात महाअभिषेक व महाआरती,पालखी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.