नाशिक- दुचाकीवरून पडल्याने एक दाम्पत्य जखमी झाल्याची घटना समोर आली आहे. ही घटना काल वणी-सापुतार मार्गावर असलेल्या सराड गावाजवळ घडली. रुग्णांना प्राथमिक उपचारानंतर जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. राममनोहर जगपतलाल विश्वकर्मा आणि फरजाना राममनोहर विश्वकर्मा असे अपघात झालेल्या दामपत्याचे नाव आहे.
राममनोहर जगपतलाल विश्वकर्मा (वय.६०) हे आपल्या पत्नी फरजाना रामनोहर विश्वकर्मा (वय.५०, दोघेही रा. बिकानेर) यांच्याबरोबर दुचाकीने राजस्थानच्या बिकानेर येथून नाशिकमार्गे अहमदनगरच्या दिशेने प्रवास करत होते. दरम्यान, वणी-सापुतारा मार्गावरील सराड जवळ हे दोघेही दुचाकीवरून पडले. या अपघातात राममनोहर जगपतलाल विश्वकर्मा यांचा हात फ्रॅक्चर झाला असून त्यांच्या पत्नी फरजाना यांना किरकोळ स्वरुपाचा मार लागला आहे. या दोघांना प्राथमिक उपचारानंतर जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारानंतर त्यांचे विलगीकरण करण्यात आल्याचे रुग्णालयातील अधिकाऱ्याने सांगितले.
हेही वाचा- समाजात तेढ निर्माण करणारे व्हिडिओ 'टिक-टॉक'वर नको; नाशिक पोलिसांची व्यवस्थापनाला नोटीस