ETV Bharat / state

सुरगाणातून अपहरण झालेल्या आदिवासी मुलीची पंजाबमधून सुटका, शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांच्या प्रयत्नांना यश - सुरगाणातून मुलीचं अपहरण

एका आदिवासी मुलीचे ४ एप्रिल रोजी सुरगाणा तालुक्यातील उंबरपाडा इथून अपहरण झाले होते. तिला शिवसेना नेत्यांच्या मदतीने पंजाब राज्यातून परत आणण्यात यश आले आहे.

girl kidnapped from surgana
सुरगाणा
author img

By

Published : May 21, 2021, 9:44 AM IST

नाशिक - जिल्ह्यातील सुरगाणा तालुक्यातील उंबरपाडा येथून अपहरण झालेल्या १२ वर्षीय आदिवासी मुलीची सुटका झाली असून ती आपल्या घरी पोहचली आहे. या आदिवासी मुलीचे ४ एप्रिल रोजी अपहरण झाले होते. ज्या ट्रक मधून तिचे अपहरण झाले त्या ट्रक मध्ये आणखी 15 मुली होत्या असे या मुलीचे म्हणणे आहे. पण त्या मुली कुठल्या होत्या हे समजले नाही, त्यांना एका ट्रकने पंजाब राज्यात नेण्यात आले होते. हा ट्रक अमृतसर भागातून एका ठिकाणी ट्रक थांबलेला असतांना ही मुलगी ट्रकमधून उडी मारून पळून गेली. अशात तीची भेट एका महिलेशी झाली. त्या महिलेने तिच्या पालकांशी संपर्क साधून घडलेल्या घटनेची माहिती दिली. घरची परिस्थिती हलाकीची असल्याने त्यांनी शिवसेनेचे सुरगाणा तालुका प्रमुख मोहन गांगुर्डे यांना सर्व हकीगत सांगितली. त्यानंतर या मुलीला घरी आणण्याचे प्रयत्न सुरू झाले.

एप्रिल महिन्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा हाहाकार सुरू असल्याने व सर्वत्र लॉकडाऊन असल्याने या मुलीला आणण्यासाठी सुरगाणा तालुक्यातून अमृतसर पंजाब येथे जाणे सहज शक्य नसल्याने त्यांनी कळवण विधानसभा मतदार संघाचे संपर्कप्रमुख केशरीनाथ पाटील यांच्या संपर्क करून मदतीचे आवाहन केले. पाटील यांनी परिस्थितीचे गांभीर्य ओळखत शिवसेना नेते खासदार संजय राऊत, उत्तर महाराष्ट्र समन्वयक रवींद्र मिर्लेकर, आमदार सुनील राऊत यांना माहिती देते त्यांच्या मार्गदर्शनाखाली सोनालीला घेण्यासाठी केशरीनाथ पाटील व मोहन गांगुर्डे यांनी पंजाबकडे प्रस्थान केले. या काळात नेते मंडळीने अमृतसर येथील शिवसेनेच्या पदाधिकारी यांचेशी भ्रमणध्वनी वरून संपर्क करून मदत करण्यासाठी सांगितले. अमृतसर येथे पोहचण्यासाठी त्यांना मोठ्या संकटांचा सामना करावा लागला. अमृतसर गाठल्यानंतर पंजाब शिवसेना राज्यप्रमुख शर्माजी, युवासेना प्रमुख संजीव भास्कर व यंत्रणेने त्यांना मदत केली. खूप प्रयत्न करून विमानाने तिला मुंबईला आणण्यात आले.

दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या शिकवणीप्रमाणे आम्ही लोकांना मदत करण्याचे काम करतो. त्यामुळेच अनेक अडचणींचा सामना करूनही या मुलीला घरी पोहचवले. त्यावेळी त्या माऊलीच्या चेहऱ्यावरील आनंद बघून झालेला त्रासही कमी झाला, असे कळवण विधानसभा मतदार संघाचे संपर्कप्रमुख केशरीनाथ पाटील यांनी म्हटले आहे.

आदिवासी भागात अशा अनेक घटना घडत असतात. मात्र या कडे कोणीच गांभीर्याने पाहत नाही. परंतु मला घटनेची माहिती मिळाली व ती माहिती मी पाटील यांच्या कानावर टाकताच त्यांनी दाखवलेल्या सकारात्मक विचारांमुळेच त्या मुलीला घरी आणणे शक्य झाले, असे शिवसेना सुरगाणा तालुकाप्रमुख मोहन गांगुर्डे यांनी सांगितले.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.