नाशिक - लासलगाव येथील कोरोनाबाधित रुग्णाला आज उपचारानंतर सुट्टी देण्यात आली. या प्रसंगी जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी जिल्हा रुग्णालयाच्या कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले आहे. नाशिककरांसाठी ही दिलासा देणारी बातमी असली तरी पुढील काळात अधिक सतर्क राहणे देखील तितकच गरजेचे असल्याचे जिल्हाधिकारी मांढरे यांनी सांगितले.
जिल्ह्यात कोरोनाचे संक्रमण वाढू नये यासाठी आटोकाट प्रयत्न सुरू आहेत. असे असताना जिल्ह्यातील लासलगाव तालुक्यात कोरोणाचा रुग्ण आढळून आला. हा रुग्ण जिल्ह्यातील पहिला कोरोनाबाधित रुग्ण होता. या रुग्णावर उपचार सुरू असताना त्याचे सर्व कोरोना चाचणी अहवाल निगेटिव्ह आले आहेत. त्यामुळे, या रुग्णाला सुट्टी देण्यात आली आहे.
या प्रसंगी जिल्ह्यात कोरोणाचा शिरकाव होऊ नये यासाठी शर्तीचे प्रयत्न करणारे जिल्हाधिकारी सुरज मांढरे, जिल्हा रुग्णालयाचे जिल्हा शल्यचिकित्सक सुरेश जगदाळे यांच्यासह रुग्णालयातील इतर डॉक्टर, नर्स, आरोग्य सेवक उपस्थित होते. यावेळी जिल्हाधिकारी मांढरे यांनी जिल्हा रुग्णालयातील कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले. रुग्णाने उपचारानंतर जिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांचे आभार मानत नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवहान केले आहे.
हेही वाचा- शिधापत्रिका नसणाऱ्यांना आधार कार्डवरच रेशन द्यावे; भुजबळांची केंद्राकडे मागणी