नाशिक - मालेगाव तालुक्यातील तळवाडे येथे मजुर बाहेर कामासाठी गेले असता आर्थिक दंड व सामाजिक बहिष्कार टाकण्याचा ठराव ग्रामपंचायतने केल्याची घटना ताजी असताना आता सटाणा तालुक्यातील (Workers Beaten In Nashik District) लाखमपूर येथे ग्रामपंचायत समोर महिला मजुरांना (Satana police station in connection) बेदम मारहाण करण्याची घटना समोर आली आहे. याबाबत सटाणा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ठराव मागे घेत असल्याचे या माफीनाम्यात लिहून दिले
नाशिक जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यातील तळवाडे येथील ग्रामपंचायतीने परिसरातील गोरगरीब स्त्री-पुरुषांच्या शेतमजुरीबाबत अत्यंत आक्षेपार्ह आणि देशाच्या घटनेला आव्हान ठरेल असा अन्यायकारक लेखी ठराव केला होता. त्यामध्ये मजुरांच्या कामाबाबत एक नियमावली तयार केली होती. सदर नियम मोडल्यास शेतकरी व मजुर यांना आर्थीक दंड करत सामाजिक बहिष्कार टाकण्याची तंबी देण्यात आली होती. याबाबत महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती आवाज उठवल्यानंतर ग्रामपंचायतीने माफीनामा सादर केला. असा बेकायदेशीर ठराव मागे घेत असल्याचे या माफीनाम्यात लिहून दिले आहे.
काय होता फतवा
जुन्या नियमावलीनुसार मजुरांना किती रोजगार द्यावा, याचबरोबर इतर गावात मजुरी करण्यात स्थानिक मजुरांना बंदी घालण्यात आली होती. नियम मोडल्यास अकरा हजार रूपये आर्थिक दंड करत किराणा व दळण बंद करून सामाजिक बहिष्कार टाकण्याची तंबी देण्यात आली आहे. (Workers Beaten In Nashik District) असे घटनाबाह्य नियम करणाऱ्या तळवाडे ग्रामपंचायतीवर सामाजिक बहिष्कार विरोधी कायद्याअंतर्गत गुन्हा करावा, अशी मागणी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने जिल्हाधिकारी यांना केली होती. (Workers beaten at Malegaon Talwade) जिल्हाधिकारी यांनी ही गंभीर बाब लक्षात घेऊन संबंधितांना चौकशीचे आदेश दिले. त्यामुळे तळवाडे ग्रामपंचायतमध्ये घबराट निर्माण झाली. भल्या सकाळी ग्रामविकास आधिकारी, तंटा मुक्ती अध्यक्ष, पोलीस पाटील, सरपंच व इतरांनी माफीनामा सादर केला. सदरचा प्रकार गैरसमजातून झाले असून माफी मागत असल्याचे लिहून दिले. कुणावर सामाजिक बहिष्कार टाकणार नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे.
मजुरांना मारहाण
मजुरांवर बहिष्कार टाकण्याचे लोन इतर गावात ही पसरत आहे. सध्या कांदे लागवडीची घाई असल्याने मजुर मिळत नाही. म्हणून स्थानिक मजुरांना इतर गावात मजुरीसाठी जाण्यास बंदी घालण्याचे प्रकार नाशिक जिल्ह्यात वाढत चालले आहे. सटाणा तालुक्यातील लखमापूर येथील महिला मजूर शेजारच्या गावी मजुरीसाठी वाहनातून जात असतांना गावकऱ्यांनी त्यांना शिवीगाळ करत मारहाण केली यात वाहनचालकाला गंभीर मारहाण केली. पिडीत महिलांनी याबाबत सटाणा पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे.
मानवी हक्कांचे उल्लंघन
मजुरांवर सामाजिक बहिष्कार टाकणे हे मानवी हक्कांचे उल्लंघन आहे. सामाजिक बहिष्कार विरोधी कायद्यान्वये तो गुन्हा आहे. तळवाडे ग्रामपंचायतने असा ठराव मागे घेतला तरी अनेक गावांत असे प्रकार चालत असल्याचे समोर आले आहे. प्रशासनाने याची गंभीर दखल घेण्याची गरज आहे असे मत सामाजिक बहिष्कार विरोधी कायद्याचे कार्यकर्ते कृष्णा चांदगुडे यांनी व्यक्त केले आहे.
आम्हाला न्याय पाहिजे
आम्ही पोटापाण्यासाठी गावाबाहेर मजुरी करण्यासाठी साठी चाललो होतो. तेव्हा आमचे वाहन गावातील लोकांनी अडवून ग्रामपंचायती समोर ड्रायव्हरला बेदम मारहाण करण्यात आली. तो विनवणी करत होता. आम्ही पैसे देतो, पण मारू नका असे आम्ही म्हणत होतो. परंतु, त्यांनी ऐकले नाही. त्यांनी आम्हा महिला मुलींना केस ओढून बेदम मारहाण केली. ज्या व्यक्तींनी असे कृत्य केले त्यांना शिक्षा झाली पाहिजे आणि आम्हाला न्याय मिळाला पाहिजे असे पीडित माहिलांनी सांगितलं.
हेही वाचा - माहिंद्रा साहेब हवी तर तुम्हाला दुसरी गाडी देऊ! दत्तात्रय लोहार यांचा गाडी देण्यास नकार