नाशिक - प्रियकराने आपल्या प्रेयसीच्या १४ वर्षीय मुलीवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना निफाट तालुक्यातील बेहड येथे घडली आहे. आकाश सचिन सूर्यवंशी (वय २५) असे त्या संशयित प्रियकराचे नाव आहे. त्याच्याविरोधात पिंपळगाव बसवंत पोलीस ठाण्यात बाल लैंगिग अत्याचार आणि पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करत अटक करण्यात आली आहे.
गुन्हा दाखल करत अटक
पीडित मुलीने दिलेल्या फिर्यादीवरून पिंपळगाव पोलीस ठाण्यात जबाब नोंदविण्यात आला असून संशयीत आरोपी आकाश विरुद्ध पिंपळगाव बसवंत पोलीस ठाण्यात बाल लैगिक अत्याचार,पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी अवघ्या काही तासात संशयित अरोपीला बेड्या ठोकल्या आहेत. या प्रकरणाचा पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक पी. वाय. कादरी करत आहे.
हेही वाचा- वैधानिक विकास महामंडळांच्या मुदतवाढीवरून गाजला अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा पहिला दिवस
हेही वाचा- CORONA Vaccination LIVE : शरद पवार, सुप्रिया सुळेंनी घेतली लस, अनेक ठिकाणी तांत्रिक अडचणी