ETV Bharat / state

नाशिक : येवल्यात 98 वर्षीय आजोबांनी बजावला मतदानाचा हक्क

तालुक्यातील ६९ ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी शुक्रवारी सकाळी मतदानाला सुरुवात झाली असून दुपारपर्यंत मतदान सुरळीत सुरु आहे. दरम्यान, अंगणगाव येथे एका 98 वर्षीय आजोबांनीदेखील मतदानाचा हक्क बजावला आहे.

98-year-old-grandfather-exercised-his-right-to-vote-in-yeola-in-nashik
नाशिक : येवल्यात 98 वर्षीय आजोबांनी बजावला मतदानाचा हक्क
author img

By

Published : Jan 15, 2021, 4:22 PM IST

येवला (नाशिक) - येवला तालुक्यातील ६९ ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी शुक्रवारी सकाळी मतदानाला सुरुवात झाली असून दुपारपर्यंत मतदान सुरळीत सुरु आहे. या निवडणुकीत युवकांपासून ते वृद्धांपासून सर्वजण मतदानाचा हक्क बजावत आहेत. दरम्यान, अंगणगाव येथे एका 98 वर्षीय आजोबांनीदेखील मतदानाचा हक्क बजावला आहे.

१३८० अधिकारी, कर्मचारी नियुक्त -

६९ ग्रामपंचायतींसाठी ४० निवडणूक निर्णय अधिकारी नियुक्त करण्यात आले आहेत. तर एकूण १३८० अधिकारी, कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहेत. तालुक्यात ग्रामपंचायत निवडणुकीसाठी २०३ मतदान केंद्र असणार असून या प्रत्येक केंद्रावर एक मतदान केंद्राध्यक्ष, तीन सहायक, प्रत्येकी एक शिपाई व पोलीस असे एकूण ६ कर्मचारी असणार आहेत.

१०७३ उमेदवार रिंगणात -

६९ ग्रामपंचायतीच्या २५३ वार्डांमधून ६५३ सदस्य निवडून द्यायचे होते. त्यासाठी १७७३ अर्ज दाखल झाले होते.अखेरच्या दिवशी ५०९ उमेदवारांनी माघार घेतली होती. आता ४६३ सदस्य निवडीसाठी १०७३ उमेदवार रिंगणात आहेत. तर तालुक्यातील पारेगाव, सावरगाव, पिंपरी, पिंपळगाव जलाल, कुसमाडी, आडसुरेगाव, कानडी, कातरणी या आठ ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या आहेत.

हेही वाचा - ..तर आम्ही रोज पंतप्रधानांचा राजीनामा मागितला पाहिजे- संजय राऊत

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.