ETV Bharat / state

चिंताजनक..! 24 तासांत मालेगावात 82 नवे रुग्ण; एकूण आकडा... - कोरोना बातमी

मालेगावमध्ये कोरोनाचे थैमान सुरू असून मागील 24 तासात मालेगावमध्ये 82 कोरोना बाधित रुग्ण आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. या नवीन कोरोना रुग्ण वाढीने मालेगावात कोरोना बाधित रुग्णांनांचा आकडा 276 वर पोहोचला आहे.

82-new-patients-tested-positive-in-malegaon-in-24-hours

author img

By

Published : Apr 30, 2020, 10:00 AM IST

नाशिक- कोरोना व्हायरसने जगभरात थैमान घातले आहे. महाराष्ट्रातही कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. त्यातच नाशिकमधील मालेगाव हे कोरोनाचे मोठे 'हाॅटस्पाॅट' बनले आहे. 24 तासात मालेगावात 82 कोरोनाचे नव्याने रुग्ण वाढले आहेत. एकट्या मालेगावात 253 तर जिल्ह्यात कोरोना बधितांनाचा आकडा आता 276 वर पोहोचला असल्याने नाशिकच्या चिंतेत वाढ झाली आहे.

हेही वाचा- #coronavirus : मुंबईतील हॉटस्पॉट क्षेत्रामध्ये सोशल डिस्टन्सिंगचे तीनतेरा

मालेगावमध्ये कोरोनाचे थैमान सुरू असून मागील 24 तासात मालेगावमध्ये 82 कोरोना बाधित रुग्ण आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. या नवीन कोरोना रुग्ण वाढीने मालेगावात कोरोना बाधित रुग्णांनांचा आकडा 276 वर पोहोचला आहे. मागील 24 तासांत मालेगावात 82 जणांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आले असून यात 15 पोलीस कर्मचारी आणि एका 3 महिन्याच्या मुलाचा समावेश आहे.

राज्याचे आरोग्यमंत्री आणि गृहमंत्री यांनी बुधवारी नाशिकला कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आढावा बैठक घेतली. यावेळी त्यांनी मालेगाव हॉटस्पॉट नियंत्रणासाठी पंचसूत्री योजना जाहीर केली. ही पंचसूत्री योजना लवकर अमलात आणली जाईल. या योजनेत हा परिसर दाटीवाटीचा असल्याने याठीकाणी होम क्वारंटाईन शक्य नाही. त्यामुळे येथील कोरोना रुग्णाच्या संपर्कातील व्यक्तींना संस्थात्मक क्वारंटाईन करण्यावर भर दिला जाणार आहे. ऑक्सिजनचे प्रमाण कमी असल्यास उपचार, 'पोर्टेबल एक्स-रे'द्वारे चाचणीत न्युमोनिया तपासणी व औषधे, डॉक्टरांच्या शीघ्र कृती दल तर्फे उपचार, अशी पंचसूत्री अभियानात वापरली जाईल, असे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी सांगितले.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.