ETV Bharat / state

नाशिकमध्ये गॅस सिलेंडरचा स्फोट; एकाच कुटुंबातील चार जण गंभीर

स्फोटाची तीव्रता इतकी भीषण होती की घरावरील पत्रे उडाले. या घटनेत कुटुंबातील ४ जण गंभीर भाजले गेले.

author img

By

Published : Apr 7, 2019, 1:44 PM IST

गॅस सिलेंडरचा भीषण स्फोट

नाशिक - अंबड लिंक रोडवरील एका घरात सकाळच्या सुमारास गॅस सिलेंडरचा भीषण स्फोट झाला. यामध्ये एकाच कुटुंबातील चौघे गंभीर जखमी झाले. रविंद्र ठाकरे, शैला ठाकरे, शुभम ठाकरे व संजय ठाकरे अशी या घटनेत जखमी झालेल्यांची नावे आहेत. या घटनेत कोणतीही जिवीतहानी झाली नाही.

नाशिक : गॅस सिलेंडरचा भीषण स्फोट

आज सकाळी शैला ठाकरे या स्वयंपाक करत असताना घरातील गॅसमध्ये गळती झाली. यामुळे काही क्षणातच त्याचा भीषण स्फोट झाला. स्फोटाची तीव्रता इतकी भीषण होती की घरावरील पत्रे उडाले. या घटनेत कुटुंबातील ४ जण गंभीर भाजले गेले. मात्र काही क्षणात नागरिकांनी घराकडे धाव घेत जखमींना बाहेर काढून सरकारी रुग्णालयात दाखल केले.

या घटनेमध्ये शैला ठाकरे या जास्त प्रमाणात भाजल्या गेल्या आहेत. त्यांची प्रकृती गंभीर असून या सर्व जखमींवर सरकारी जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहे.

Intro:नाशिकच्या अंबड लिंक रोडवरील एका घरात सकाळच्या सुमारास गॅस सिलेंडरचा लिकेज झाल्याने भीषण स्फोट झाला यामध्ये एकाच कुटुंबातील चौघे जखमी झाले आहेत रविंद्र ठाकरे शैला ठाकरे शुभम ठाकरे संजय ठाकरे अशी या घटनेत जखमी झालेल्यांची नावे आहेत सुदैवाने या घटनेत कोणतीही जिवीतहानी झाली नाही

Body:सकाळी शैला ठाकरे या स्वयंपाक करत असताना अचानक घरातील गॅस लिकेज झाला आणि काही क्षणातच त्याचा भीषण स्फोट झाला स्फोटाची तीव्रता इतकी भीषण होती की घरावरील पत्रे उडाले आणि घरातील असलेल्या कुटुंबातील चार ही जण गंभीर भाजले गेले मात्र काही क्षणात नागरिकांनी घराकडे धाव घेत जखमींना बाहेर काढून सरकारी रुग्णालयात दाखल केले

Conclusion:यामध्ये शैला ठाकरे या जास्त प्रमाणात भाजल्या गेल्या आहेत त्यांची प्रकृती गंभीर आहे या सर्व जखमींवर सरकारी जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहे.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.