नाशिक - जिल्ह्यातील कोरोनाचा आलेख चढता असल्याचे दिसून येत आहे. नाशकात दिवसेंदिवा कोरोनाचा रुग्णांमध्ये वाढ होत असून शुक्रवारी नाशिक जिल्ह्यात 38 नवीन कोरोनाबाधितांची भर पडली आहे. त्यामुळे प्रशासनाच्या चिंता वाढली आहे.
नाशिक जिल्ह्यात कोरोनाचा कहर दिवसेंदिवस वाढतच असून जिल्ह्यातील 420 कोरोना संशयितांच्या चाचणी करण्यात आली होती. त्यापैकी ३८० जणांचे अहवाल निगेटिव्ह आल असून ३८ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. यामध्ये १३ जण नाशिक शहरातील असून ७ जण सातपूर परिसरातील रहिवासी आहे. हिरावाडी, मालपाणी सेफ्रॉन, श्रीकृष्ण नगर, पाटील नगर आणि नवीन नाशिक येथील प्रत्येकी एका जणाला कोरोनाची बाधा झाली, तर कोरोनाचा हॉटस्पॉट ठरलेल्या मालेगाव मध्ये पुन्हा 21 कोरोनाबाधितांची भर पडली आहे. यामध्ये 3 जण हे ग्रामीण भागातील असून एक व्यक्ती ही जिल्ह्याबाहेरील आहे. नव्याने आढळून आलेलेे बाधित रुग्ण यापूर्वीच्या कोरोना रुग्णांच्या संपर्कातील असल्याचे सांगितले जात आहे.
दरम्यान, नाशिक शहरात ज्या ठिकाणी कोरोनाबाधित आढळून आले आहेत ते परिसर सील करण्यात आले असून या ठिकाणी प्रशासनाच्या वतीने तातडीने औषध फवारणी देखील करण्यात येत आहे. कोरोना बाधितांच्या संपर्कात आलेल्यांना तातडीने क्वारंटाइन करण्यात येत आहे.
जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नाशिक जिल्हा प्रशासन आणि आरोग्य यंत्रणा साम-दाम-दंड या त्रिसूत्रीचा वापर करत असून कोरोनाला आळा बसावा म्हणून नाशिककरांनी देखील प्रशासनाला सहकार्य करणे गरजेचे आहे.त्यामुळे नागरिकांना घरी राहून प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन प्रशासनाकडून केले जात आहे.
सध्याची नाशिक जिल्ह्याची आकडेवारी -
नाशिक शहर 34, नाशिक ग्रामीण 53, मालेगाव 441 , इतर जिल्ह्यातील 15 कोरोनाबाधित आहेत, तर आत्तापर्यंत जिल्ह्यात 17 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत कोरोना रुग्णांचा आकडा 557 वर जाऊन पोहोचला आहे