नाशिक - जिल्ह्यातील कोरोनाचा हॉटस्पॉट ठरलेल्या मालेगावात पुन्हा 36 रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह मिळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. एकट्या मालेगावमध्ये आता 164 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण असून नाशिक जिल्ह्यातील कोरोनाबाधितांचा आकडा 186 वर जाऊन पोहोचला आहे.
कोरोनाचा हॉटस्पॉट ठरलेल्या मालेगावात आता परिस्थिती काहीशी बदलतानाचे चित्र असतानाच आज(मंगळवार) मालेगावमध्ये 36 कोरोना संभाव्यांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. ह्यामध्ये 22 पुरुष, 14 महिला तर एका बालकाचा समावेश आहे. ह्यामुळे आता एकट्या मालेगावमध्ये कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचा आकडा 164 वर जाऊन पोहचली आहे.
सोमवारी प्राप्त झालेल्या अहवालात मालेगावातील 439 जणांचे अहवाल निगेटिव्ह आल्याने मालेगावकरांना काहीसा दिलासा मिळाला होता. तर, काल मालेगावातून चार रुग्ण कोरोनामुक्त देखील झाले आहेत. मात्र, आज पुन्हा 36 पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आल्याने मालेगावकरांचा चिंता वाढल्या आहेत.