ETV Bharat / state

'खाना नही दिया तो भी चलेगा, मगर हमे घर भेजने का बंदोबस्त करो' - नाशिक न्यूज

मनमाड येथे जवळपास 250 परप्रांतीय मजूर अडकले आहेत. साहब खाना नही दिया तोभी चलेगा मगर हमे हमारे घर भेजने का बंदोबस्त करो अशी कळकळीची विनंती या मजुरांकडुून स्थानिक प्रशासनाकडे केली जात आहे.

250 migrant workers request administration for Leave us at home
परप्रांतीय़ कामगारांची प्रशासनाला विनंती
author img

By

Published : May 28, 2020, 8:37 PM IST

नाशिक - परप्रांतीय मजुरांनी घाबरण्याचे कारण नाही, कोणीही पायी किंवा इतर साधनाने जाऊ नका, त्यांच्या राहण्याची व खाण्याची व्यवस्था ही शासनाच्या वतीने करण्यात आलेली आहे, असा सरकारी आदेश जरी असला तरी तो कागदोपत्रीच आहे की काय? असा सवाल मनमाड येथे अडकलेल्या जवळपास 250 मजुरांकडे बघून उपस्थित केला जात आहे. 'साहब खाना नही दिया तोभी चलेगा मगर हमे हमारे घर भेजने का बंदोबस्त करो' अशी कळकळीची विनंती या मजुरांकडुून स्थानिक प्रशासनाकडे केली जात आहे.

परप्रांतीय़ कामगारांची प्रशासनाला विनंती

गावी जाण्यासाठी या मजुरांनी नियमानुसार सर्व कागदपत्रांची पूर्तता केली आहे. मात्र, तलाठी कार्यलयाचे उंबरठे झिजवूनदेखील त्यांना केवळ तारीख पे तारीख दिली जात आहे. शिवाय त्यांना कोणतीही मदत मिळत नसल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली असल्याचे या मजुरांचे म्हणणे आहे.

सध्या संपूर्ण जग कोरोनाच्या विळख्यात सापडले असून, भारतात देखील या महामारीने थैमान घातले आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये, यासाठी देशभरात २२ मार्चपासून लॉकडाऊन लागू करण्यात आला. लॉकडाऊनचा फटका परप्रांतीय मजुरांसोबत अनेक ठिकाणी पाहुणे म्हणून आलेल्या नागरिकांना देखील बसत आहे. मनमाड शहरात देखील उत्तर प्रदेश, बिहार येथील सुमारे २५० मजूर अडकले आहेत. शहरापासून जवळ नागापूर परिसरात असलेल्या इंडियन ऑयल कंपनीच्या एका ठेकेदाराकडे बिहार राज्यातील ६ मजूर काम करीत होते. मात्र, लॉकडाऊनमुळे काम बंद झाले आणि ठेकेदाराने या कामगारांना काही दिवसानंतर वाऱ्यावर सोडले. तेंव्हापासून हे मजूर संकटात आहेत. हा ठेकेदार बिहारचा आहे. शहरातील मनोरम सदनाच्या दुरुस्तीचे काम उत्तर प्रदेशातील ठेकेदाराला देण्यात आले आहे. त्याने त्याच्याकडे बिहार आणि युपीचे असलेल्या कामगारांपैकी ७ कामगार येथे पाठवले होते. लॉकडाऊनमुळे त्यांचेही काम बंद पडले आहे. काही दिवस शाळेने मदत केली. मात्र, आता कोणतीही मदत मिळत नसल्याचे या मजुरांचे म्हणणे आहे.

शहरालगत असलेल्या बुरकूलवाडी भागात एका कारखान्यात १२ कामगार काम करीत होते. हे सर्व बिहारचे असून, येथेही काम बंद झाले असल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. एचएके हायस्कूलजवळ बिहार येथून १७ जण आपल्या नातेवाईकांकडे कार्यक्रमासाठी आले होते. मात्र, लॉकडाऊनमुळे येथे अडकून पडले, तर काही कपडे विकण्यासाठी, काही इतर वस्तू व साहित्य घेवून आले होते. हे सर्वजण गेल्या २ महिन्यांपासून मनमाडला अडकले असून त्यांनी तलाठी कार्यलयात नाव नोंदणी करून वैद्यकीय तपासणी देखील केली आहे. त्यांच्याजवळ आता काहीही उरले नसल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. लवकरात लवकर आम्हाला आमच्या गावी पाठविण्यात यावे, अशी मागणी या मजुरांनी केली आहे.

250 migrant workers request administration for Leave us at home
परप्रांतीय़ कामगारांची प्रशासनाला विनंती

गावी जाण्यासाठी लागणारी सर्व कागदपत्रे तयार केली आहेत. त्याचप्रमाणे आमची वैद्यकीय तपासणी करून प्रमाणपत्र आम्हाला दिले आहे. मात्र, जाण्यासाठी अजूनही परवानगी मिळत नसल्याने मजुरांनी नाराजी व्यक्त केली आहे. मनमाड शहरात अडकलेले मजूर व नागरिकांची यादी तयार करून जिल्हाधिकारी कार्यलयाकडे पाठवण्यात आलेली आहे. जिल्ह्यातून एकच श्रमिक ट्रेन सुटते. ट्रेनची व्यवस्था होताच या मजुरांना त्यांच्या गावी पाठविण्यात येईल, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.