ETV Bharat / state

मनमाडमध्ये टँकरमधून पेट्रोल-डिझेल काढणारे दोघे रंगेहात ताब्यात

author img

By

Published : Feb 8, 2020, 10:40 AM IST

पानेवाडी परिसरात टँकरमधून बेकायदेशीरपणे पेट्रोल-डिझेल काढतांना दोन जणांना पोलिसांनी अटक केली आहे. तसेच यावेळी पोलिसांनी एकूण 33 लाख 11 हजार 452 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

Nashik
टँकरमधून पेट्रोल-डिझेल काढणारे दोघे रंगेहाथ ताब्यात

नाशिक - मनमाड शहरातील पानेवाडी परिसरात टँकरमधून बेकायदेशीरपणे पेट्रोल-डिझेल काढताना दोन जणांना पोलिसांनी रंगेहात पकडले. त्यांच्यावर विविध कलमानुसार पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच संबंधित जागा मालकावर देखील गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

उपविभागीय पोलीस अधीक्षक समिरसिंग साळवे ईटीव्ही भारतशी बोलताना

हेही वाचा - मालेगावात मुलांच्या भांडणातून राजकीय नेत्याचा पोलिसांसोबत वाद, पोलीस ठाण्यासमोर जमलेल्या जमावामुळे तणाव

याबाबत अधिक माहिती अशी, मनमाडनजीक असलेल्या पानेवाडी येथे इंडियन ऑइल, भारत पेट्रोलियम, हिंदुस्थान पेट्रोलियम यासह गॅसचे टर्मिनल आहेत. या ठिकानाहून उत्तर महाराष्ट्रासह अनेक ठिकाणी इंधन पुरवठा केला जातो. यातील काही टँकर मालक व चालक हे बनावट चावीच्या साहाय्याने बेकायदेशीरपणे पेट्रोल व डिझेल काढून बाहेर विक्री करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार आज (शनिवारी) पहाटे भारत पेट्रोलियम समोरील व्यापारी संकुलाच्या पाठीमागील मैदानात (एमएच-04-डीएस-0291) मधून टँकर मालक भाऊराव वसंत वाघ (वय 37 रा. बुद्धलवाडी मनमाड), टँकर चालक अप्पा गणपत घुगे (वय 38 रा. खादगाव) हे दोघे डिझेल काढताना आढळून आले.

या कारवाईत टँकरसह एकूण 33 लाख 11 हजार 452 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याआधीही या ठिकाणाहून अनेक पेट्रोल डिझेल काढणाऱ्या टँकर चालक व मालकांवर कारवाई करण्यात आली आहे. तरीही येथील चोऱ्यांचे प्रमाण कमी होत नसून गेल्या 3 महिन्यांत पेट्रोल डीझेल चोरी करणाऱ्या 25 टँकरवर कारवाई करण्यात आली आहे.

मनमाड उपविभागीय पोलीस अधीक्षक समिरसिंग साळवे यांनी आज रस्त्यावर उभ्या असनाऱ्या 18 टँकरवर गुन्हा दाखल केला आहे. तसेच अशा चोऱ्यांचा मुळासकट नायनाट करणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. आजच्या कारवाईत पोलीस निरीक्षक राजेंद्र कुटे, पोलीस उपनिरीक्षक गणेश जांभळी, पोलिस हवालादर सुनील पवार, पोलीस नायक संदीप वनवे, पोलीस शिपाई मुदस्सर शेख, पोलीस शिपाई गौरव गांगुर्डे, पोलीस शिपाई बस्ते, चंदू मांजरे, आदी सहभागी होते.

हेही वाचा - दिंडोरी तालुक्यातील अल्पवयीन मुलीवर अत्याचार, संशयितास अटक

Intro:ब्रेकिंग:
मनमाड:मनमाड शहरातील पानेवाडी परिसरात असलेल्या भारत पेट्रोलियम कंपनीच्या समोरील बाजूस मोकळ्या मैदानात पहाटे 6 वाजेच्या दरम्यान मनमाड पोलिसांनी सापळा रचुन टँकर मधुन बेकायदेशीर रित्या पेट्रोल डिझेल काढतांना दोन जणांना अटक केली असुन संबंधित जागा मालकांवर देखील गुन्हा दाखल करण्यात आला आहे.Body:याबाबत सविस्तर वृत्त असे की मनमाड नजीक असलेल्या पानेवाडी येथे इंडियन ऑइल भारत पेट्रोलियम हिंदुस्थान पेट्रोलियम यासह गॅसचे टर्मिनल आहेत.याठिकानाहून उत्तर महाराष्ट्रसह अनेक ठिकाणी इंधन पुरवठा केला जातो.यातील काही टँकर मालक व चालक हे बनावट चावीच्या साहाय्याने बेकायदेशीर पेट्रोल व डिझेल काढुन बाहेर विक्री करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली त्या अनुसंघाने त्यांनी आज पहाटे सापळा रचुन भारत पेट्रोलियम समोरील व्यापारी संकुलाच्या पाठीमागिल मैदानात टँकर क्रमांक MH04 -DS-0291 मधुन टँकर मालक भाऊराव वसंत वाघ(वय ३७)राहणार बुद्धलवाडी मनमाड व टँकर चालक अप्पा गणपत घुगे(वय३८)राहणार खादगाव हे दोघे
डिझेल काढताना आढळून आले.त्यांच्यावर कलम ३७९,४०६,४२०/३४ तसेच जीवनावश्यक वस्तूंच्या कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असुन या जागेच्या मालकावर देखील गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या कारवाईत टँकरसह एकूण ३३ लाख ११४५२ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.Conclusion:याआधीही या ठिकाणाहून अनेक पेट्रोल डिझेल काढणाऱ्या टँकर चालक व मालकांवर कारवाई करण्यात आली आहे.तरीही येथील चोऱ्यांचे प्रमाण कमी होत नसुन गेल्या तीन महिन्यांत पेट्रोल डीझेल चोरी करणाऱ्या 25 टँकर ब्लॅकलिस्ट करण्यात आल्या आहे.मनमाड उपविभागीय पोलीस अधीक्षक समिरसिंग साळवे यांनी आज रस्त्यावर उभ्या असनाऱ्या 18 टँकरवर गुन्हा दाखल केला असुन अशा चोऱ्यांचा मुळासकट नायनाट करणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.आजच्या कारवाईत पोलीस निरीक्षक राजेंद्र कुटे पोउपनिरीक्षक गणेश जांभळी
पोलिस हवालादर सुनील पवार
पोलिस नायक संदीप वनवे
पोलिसशिपाई मुदस्सर शेख
पोलिस शिपाई गौरव गांगुर्डे
पोलिस शिपाई बस्ते चंदू मांजरे आदीजन सहभागी झाले होते.
बाईट
समिरसिंग साळवे,उपविभागीय पोलीस अधिक्षक मनमाड
आमिन शेख, मनमाड
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.