ETV Bharat / state

नाशिकहून 1 हजार 500 परप्रांतीय विशेष रेल्वेने मध्य प्रदेशला रवाना

सिन्नरच्या मुसळगाव व माळेगाव औद्योगिक वसाहतीतील 539 परप्रांतीय कामगारांना 23 बसेसमधून नाशिकरोड स्थानकावर सोडण्यात आले, तेही या रेल्वेने रवाना झाले.

author img

By

Published : May 14, 2020, 12:13 PM IST

Nashik
परप्रांतीय विशेष रेल्वेने मध्य प्रदेशला रवाना

नाशिक - लॉकडाऊन काळात राज्यात अडकलेल्या परप्रांतीयांना केंद्र सरकारने विशेष रेल्वेगाडीद्वारे त्यांचा राज्यात सोडण्यासाठी परवानगी दिली आहे. त्यानुसार 13 मे ला नाशिकरोड ते रेवा मध्यप्रदेश या स्थानकादरम्यान 24 डब्यांची विशेष रेल्वे 1 हजार 532 प्रवाशांना घेऊन रवाना झाली.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेल्या लॉकडाऊन काळात बिहार, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, झारखंड येथील मजूर कामगार हे मुंबई, पुणे,नाशिक मध्ये अडकलेले आहे. मुंबईहून 4 दिवसांपासून या परप्रांतीयांनी मिळेल त्या गाडीने घराचा रस्ता धरला आहे. या अनेक जणांनी पायीच घरी जायला पसंती दिली होती, यात अनेक जण आजारी पडत असल्याने त्यांच्यासाठी रेल्वेची जिल्हा प्रशासनाने परवानगी मागितली होती.

दोन आठवड्यापासून मजुरांनी जिल्हा प्रशासनाकडे ऑनलाइन नोंदणी केली होती. ऑनलाइन नोंदणी केलेल्या 1 हजार 532 परप्रांतीयांना नाशिक रोड येथून विशेष रेल्वेने मध्य प्रदेशातील रेवा स्थानकापर्यंत सोडण्यात आले. यासाठी मध्यप्रदेश सरकारने रेल्वेला 1 कोटी रुपये जमा केले असून त्यानुसार रेल्वे सोडण्यात आली.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.