नाशिक - जिल्ह्यामध्ये कोरोनाबधितांचा आकडा झपाट्याने वाढत आहे. गुरुवारी जिल्ह्यात 131 कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले असून नाशिक शहरातील 63 रुग्णांचा त्यात समावेश आहे. तर 9 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. आतापर्यंत जिल्ह्यात 4 हजार 584 कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. तर 2 हजार 594 जण कोरोनामुक्त झाले आहेत. तसेच आतापर्यंत कोरोनामुळे 249 जणांचा बळी गेला आहे.
ग्रामीण भागात देखील वाढतोय कोरोनाचा संसर्ग -
सिन्नर तालुक्यात देखील कोरोनाबधितांचा आकडा 119 वर जाऊन पोहोचला आहे. उपजिल्हा रुग्णालय व खासगी रुग्णालयात 34 कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत. दिलासादायक बाब म्हणजे, येथील 81 जण कोरोनामुक्त झाले आहेत.
निफाड तालुक्यात कोरोनाबधितांचा आकडा 100 वर पोहचला आहे. आतापर्यंत येथे 11 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. तर 40 जण कोरोना मुक्त झाले आहेत. गुरुवारी आढळले कोरोनाबाधित हे नाशिक ग्रामीण 44 , नाशिक मनपा 63 , मालेगाव 20 , जिल्हा बाह्य 4 असे आहेत.
नाशिक जिल्ह्याची आतापर्यंतची परिस्थिती -
- नाशिक जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्ण 4 हजार 58
- कोरोनामुक्त - 2 हजार 494
- एकूण मृत्यू -249
- एकूण उपचार घेत असलेले रुग्ण -1 हजार 741
- नवीन संशयित - 510
- आतापर्यंत घेतलेले स्वँब -22 हजार 625