ETV Bharat / state

धक्कादायक..! नाशिकात चक्कर येऊन एका दिवसात 11 जणांचा मृत्यू - dizziness death nashik

नाशिकमध्ये कोरोनाचा उद्रेक झाला असून दुसरीकडे एका दिवसात शहरात चक्कर येऊन 11 जणांचा मृत्यू झाला आहे. एका दिवसात 11 जणांच्या मृत्यूच्या घटनांमुळे वैद्यकीय क्षेत्रात चिंता व्यक्त होत असून शहरातील वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

death nashik 11 dizziness
चक्कर मृत्यू नाशिक
author img

By

Published : Apr 21, 2021, 3:47 PM IST

Updated : Apr 21, 2021, 4:00 PM IST

नाशिक - नाशिकमध्ये कोरोनाचा उद्रेक झाला असून दुसरीकडे एका दिवसात शहरात चक्कर येऊन 11 जणांचा मृत्यू झाला आहे. एका दिवसात 11 जणांच्या मृत्यूच्या घटनांमुळे वैद्यकीय क्षेत्रात चिंता व्यक्त होत असून शहरातील वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

हेही वाचा - नाशिकच्या विविध भागांतून बुलेट चोरी करणारा चोरटा गजाआड

नाशिक शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असून रोज 2 हजाराच्या पटीत कोरोनाबाधित आढळून येत असून 20 ते 22 जणांचा मृत्यू होत आहे. अशात 20 एप्रिल रोजी एका दिवसात चक्कर येऊन 11 जणांचा मृत्यू झाल्याने चिंता वाढली आहे. या मृत व्यक्तींच्या कोरोना चाचणीत 5 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. चार दिवसांपूर्वी देखील एकाच दिवशी 9 जणांचा चक्कर येऊन मृत्यू झाला होता. बहुतांश रुग्णालयांमध्ये बेड शिल्लक नाही, अशी परिस्थिती असून अशा परिस्थितीत इतर आजरांचे रुग्ण उपचारापासून वंचित राहत आहेत. अशा वेळी रुग्णांना उपचार मिळत नाही, त्यामुळे रुग्ण दगावण्याची संख्या वाढली आहे.

चक्कर येण्याची कारणे

चक्कर येणे, डोळ्यापुढे अंधार येणे, थकवा, अशक्तपणा जाणवणे, डोळे गरगरणे, डोळ्या पुढे अंधार येऊन चक्कर येणे, हृदयविकारापासून ते अ‌ॅनेमिया असे कोणतेही गंभीर आजार असू शकते. अशक्तपणा तसेच कमी रक्तदाब, औषधे, सांधे कमजोर, मधुमेह, पैनिक अटॅक, हृदय समस्या, ताणतणाव या लक्षणांमुळे चक्कर व श्वास घेण्यास त्रास होऊ शकतो. अशावेळी तत्काळ वैद्यकीय सल्ला घेणे गरजेचे आहे.

वॉक टेस्ट महत्वाची

नाशिक शहरात 95 टक्के कोरोनाबाधित घरीच उपचार घेत आहे. रुग्ण बरे झाल्यानंतर किमान 15 दिवस काळजी घेणे महत्वाचे असते. बरे झालेल्या रुग्णाला सहा मिनिटे वॉक टेस्ट करणे गरजेचे आहे. यात बरे झालेले वृद्ध, तरुण महिला पुरुष यांनीही टेस्ट करणे गरजेचे आहे. रक्तातील ऑक्सिजन मोजण्यासाठी पल्स ऑक्सिमीटरचा वापर करावा. आणि यात 90 च्या खाली ऑक्सिजन असेल तर तत्काळ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

भीती हे मृत्यूला कारण होऊ शकते

अनेक नागरिक कोरोनाबाधित झाल्यानंतरसुद्धा उन्हात बाहेर पडत आहेत. तसेच, काही रुग्णांच्या मनात कोरोना विषयी भीती निर्माण झाली आहे. तसेच, काही लोक घाबरलेले आहेत. त्यामुळे, फोबियामुळे काही जणांना हार्ट अटॅक येऊ शकतो. घाबरून कोसळने, त्यामुळे डोक्याला मार लागणे किंवा उष्णतेमुळे शरीरातील पाणी कमी होणे.

हेही वाचा - डॉ. झाकीर हुसेन हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजन गळती, 61 रुग्णांची प्रकृती गंभीर

Last Updated : Apr 21, 2021, 4:00 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.