ETV Bharat / state

पंढरीकडे निघालेल्या सायकल वारीला गालबोट; ९ वर्षीय चिमुरड्याचा ट्रकखाली चिरडून मृत्यू - सायकल वारी

मृत चिमरडा
author img

By

Published : Jun 28, 2019, 9:35 AM IST

Updated : Jun 28, 2019, 11:54 AM IST

2019-06-28 09:29:55

घटनास्थळावरील घटना

नाशिक - नाशिकवरून पंढरपूरला निघालेल्या सायकल वारीला गालबोट लागले आहे. वारीमध्ये एका ९ वर्षीय चिमुरड्याचा ट्रकखाली चिरडून मृत्यू झाला आहे. प्रेम सचिन निफाडे असे या मृत मुलाचे नाव आहे.

आषाढी एकादशी जवळ येत असताना वारकरी भक्तांना विठ्ठलाच्या भेटीची ओढ लागलेली आहे. त्यासाठीच अनेक ठिकाणाहून पालख्या, वारी पंढरीला जात आहेत. त्याचप्रमाणे आज सकाळी शहरातून सायकल वारीचे प्रस्थान करण्यात आले. प्रेम आपल्या आईवडीलांसह या वारीमध्ये सहभागी झाला होता. मात्र, सिन्नर बायपासवर वारी येताच प्रेमचे सायकलवरील नियंत्रण सुटले आणि तो रस्त्यावर पडला. आईवडिलांनी ट्रकचालकाला आरडाओरडा करून ट्रक थांबवण्याचे इशारा केला. मात्र, चालकाने भरधाव वेगाने ट्रक चालवत प्रेमला चिरडले.

कृष्णा बबन राऊत असे चालकाचे नाव असून पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे. तसेच मुलाचा मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. चालक दारूच्या नशेत असल्याने हा अपघात घडल्याचे पोलिसांनी सांगितले.

दरम्यान या सायकल वारीत १८ वर्षाखालील मुलांना सायकल चालवण्यास बंदी घातली आहे. त्यामुळे अन्य वारकीर ही वारी पूर्ण करणार आहेत.

Intro:Body:Conclusion:
Last Updated : Jun 28, 2019, 11:54 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.