ETV Bharat / state

नाशिक महानगरपालिकेला शहरात 'आपला दवाखान्यां'ना जागा मिळतं नसल्यानं 10 कोटी परत जाणार? - Aapla Dawakhana

Aapla Dawakhana : दिल्लीच्या मोहल्ला क्लिनिकच्या धर्तीवर नाशिकमध्ये "बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना" प्रकल्प सुरू करण्यात आला. (Nashik Municipal Corporation) मात्र, जागा उपलब्ध होत नसल्यानं तो अडचणीत सापडला आहे. त्यामुळे दवाखान्यासाठी उपलब्ध झालेला 10 कोटी रुपयांचा निधी परत जाण्याच्या मार्गावर आहे.

10 crores will go back to Nashik
आपला दवाखाना
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jan 17, 2024, 10:26 PM IST

नाशिक Aapla Dawakhana : शहरात 45 पैकी केवळ चुंचाळेत येथे एक दवाखाना सुरू आहे. (CM Eknath Shinde) त्यामुळे प्रकल्पासाठी प्राप्त दहा कोटीचा निधी परत जाणार आहे, 'आपला दवाखाना' ही संकल्पना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे सरकारमध्ये आरोग्यमंत्री असताना राबविण्याचं ठरवलं होतं. मात्र, त्याची अंमलबजावणी होण्यापूर्वीच सत्तांतर झाले. नाशिकमध्ये सुरुवातीला 45 ठिकाणी 'आपला दवाखाना' सुरू केले जाणार होते; परंतु वर्षभरात केवळ चुंचाळे घरकुल शिवारात दवाखाना सुरू झाला. (fund for Aapla Dawakhana)

घरमालकानेच जबाबदारी घ्यायची : सरकारी रुग्णालयात दैनंदिन रुग्णांमुळे हॉस्पिटलवरील ताण वाढतो. ज्याचा थेट परिणाम अपघात विभाग, आयसीयू आणि प्रसूती विभाग अशा तत्काळ उपचार गरजेचा असलेल्या रुग्णांच्या उपचारावर होतो. महानगरपालिकेकडून 25 ठिकाणी 'आपला दवाखाना' सुरू करण्याचे प्रयत्न सुरू होते. एक दवाखान्याला 500 ते 1000 चौरस फूट जागा मनपाकडे उपलब्ध नसल्यास नागरी वस्तीतच 50 हजार ते एक लाखापर्यंत भाडेतत्त्वावर जागा घेण्याचे निर्देश आहेत; मात्र यात घरमालकालाच वीज बिल, पाणी बिल आणि स्वच्छतेच्या जबाबदारी बाबत निर्देश देण्यात आले आहेत.

निधी परत जाणार : दवाखान्याच्या निर्मितीसाठी प्रत्येकी 43 लाख 47 हजार रुपये खर्च अपेक्षित आहे. शासनाकडून सुमारे दहा कोटींचा निधी प्राप्त झाला होता; मात्र आता जागा उपलब्ध होत नसल्यानं आणि काही जाचक अटी असल्यानं हा निधी परत जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

जागा उपलब्धता होत नाही : नाशिक शहरात 25 ठिकाणी 'आपला दवाखाना' प्रास्तावित केले आहेत; मात्र जागा उपलब्ध होत नसल्याने हे दवाखाने सुरू झालेले नाहीत. दवाखान्यासाठी एक डॉक्टर, परिचारिका, आरोग्य सेवक, मदतनीस असे कर्मचारी असतील असं महानगरपालिकेचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. तानाजी चव्हाण यांनी सांगितलं.

काय आहेत दवाखान्यात सुविधा?
- बाह्य रुग्ण सेवा - वेळ सायंकाळी 5 ते रात्री 10
- मोफत औषधोपचार, मोफत तपासणी
- कन्सल्टंटद्वारे तज्ज्ञांचा सल्ला
- गर्भवती मातांची तपासणी
- लसीकरण
- बाह्य यंत्रणाद्वारे रक्त तपासणीची सोय
- महिन्यातून निश्चित केलेल्या दिवशी मानसिक आरोग्यासाठी समुपदेशन सेवा
- तसेच महिन्यातून एकदा नेत्रतपासणी

हेही वाचा:

  1. महायुती सरकारचा अँम्ब्युलन्स घोटाळा, 8 हजार कोटी कंत्राटदाराच्या घशात - वडेट्टीवार
  2. मोठी बातमी! पंतप्रधान मोदींच्या अयोध्या दौऱ्यात होऊ शकतो बदल, आता 'या' दिवशी जाणार अयोध्येला
  3. ठाकरे गटाच्या लोकसभा निवडणुका 'मशाल' चिन्हावरच - खासदार विनायक राऊत

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.