ETV Bharat / state

नाशिक जिल्ह्यातील 1 हजार 600 गावं कोरोनामुक्त; रुग्णसंख्येत मोठी घट

नाशिक जिल्ह्यात आतापर्यंत 23 लाख 87 हजार 584 जणांची कोरोना चाचणी करण्यात आली असून यापैकी 4 लाख 4306 जण पॉझिटिव्ह झाले असून त्यापैकी 3 लाख 4718 जण कोरोनामुक्त झाले असून 8 हजार 555 जणांचा मृत्यू झाला असून सद्य स्थितीत जिल्ह्यात 1 हजार 33 जणांवर उपचार सुरू आहेत.तर रिकव्हरी रेट 97.63 टक्के इतका आहे.

रुग्णसंख्येत मोठी घट
रुग्णसंख्येत मोठी घट
author img

By

Published : Aug 20, 2021, 9:40 AM IST

नाशिक - जिल्ह्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने हाहाकार केला. अशात लाखो नागरिकांना कोरोनाची लागण होत हजारो नागरिकांचा मृत्यू झाला. मात्र कडक लॉकडाऊन सोबत नागरिकांनी कोरोना नियमांचे केलेलं पालन यामुळे नाशिक जिल्ह्यात कोरोनाची लाट ओसरत आहे. नाशिक जिल्ह्यातील 1600 गावं कोरोनामुक्त झाली असून हे प्रमाण 70 टक्के आहे. तसेच नाशिक शहरात देखील कोरोनाची रुग्णसंख्या कमी होतं असल्यानं नाशिककरांना दिलासा मिळाला आहे.

तीन लाख बाधित

मार्च 2021 पासून नाशिक मध्ये तिसऱ्या लाटेने थैमान घातले होते. अशात 3 लाखांहून अधिक नागरिकांना कोरोनाची लागण झाली तर 8 हजार हुन अधिक नागरिकांचा बळी गेला आहे. नाशिक जिल्ह्यातील 1 हजार 907 गावातील आदिवासी पाडे, वस्ती वगळता सर्वत्र कोरोनाने हाहाकार केला होता. मात्र आता परिस्थिती नियंत्रणात येत असल्याने जिल्हा प्रशासनाने सुटकेचा निःश्वास सोडला आहे.

सिन्नर, निफाड हॉटस्पॉट

एकीकडे नाशिक जिल्ह्यातील रुग्णसंख्या कमी होत असतांना अद्याप सिन्नर व निफाड तालुक्यात कोरोनाचा प्रसार वाढत आहे. जिल्हा आरोग्य विभागाने या जिल्ह्याकडे लक्ष केंद्रित केले असून कोरोनाचा प्रसार कसा कमी होईल यासाठी प्रयत्न केले जात आहे. तसेच ज्या भागात कोरोनाचा प्रादुर्भाव आहे, अशाठिकाणी कोरोना सदृश लक्षणे आढळल्यास तात्काळ संबंधित व्यक्तीची कोरोना चाचणी केली जात आहे. जिल्ह्यात सद्यस्थितीत रोज एक हजार कोरोना चाचणी केली जातं आहे

तालुक्यातील कोरोनामुक्त गावं -

चांदवड 103, बागलाण 141, देवळा 44, इगतपुरी 115, दिंडोरी 122, कळवण-150, मालेगाव-113, नांदगाव 94, नाशिक 63,निफाड-95, पेठ-145, त्रंबक-117, सुरगाणा -190 सिन्नर-79,येवला-36

कोरोनाची सद्यपरिस्थिती -

नाशिक जिल्ह्यात एकूण 1033 एक्टिव्ह रुग्ण संख्या असून यापैकी शहरात 545 तर ग्रामीण भागात 434 इतकी रुग्ण संख्या आहे.यात चांदवड 30,बागलाण 27 ,देवळा 13,इगतपुरी 9,दिंडोरी 19,कळवण-3,मालेगाव-35,नांदगाव 31, नाशिक 27,निफाड-87, पेठ-00, त्रंबक-00, सुरगाणा -01 सिन्नर-124 , येवला-38

आतापर्यंत 4 लाख 4306 जण पॉझिटिव्ह

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.