नंदुरबार - जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका जाहीर होऊन देखील जिल्ह्यातील राजकीय पातळीवर सांतता दिसून येत आहे. लोकप्रतिनिधी आणि राजकीय नेत्यांनी अद्यापही गांभीर्याने घेतले नसल्याने कार्यकर्त्यांमध्ये चलबिचलता वाढली आहे. येत्या काही दिवसात जिल्हा परिषदेची लगबग सुरू झाली असून याकडे मात्र वरिष्ठांनी पाठ फिरवली आहे. त्यामुळे कार्यकर्ते संभ्रमात आहेत.
राज्यातील सत्ता स्थापनेचा पेच सुटल्यानंतर आता तरी राजकीय नेतेमंडळी कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन निवडणुकीच्या तयारीला लागतील अशी अपेक्षा कार्यकर्त्यांकडून व्यक्त केले जात आहे. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका जाहीर झाल्या आहेत. प्रत्यक्षात निवडणुकीचा अर्ज दाखल करण्याची कार्यवाही 18 डिसेंबरपासून सुरू होणार यात बराच कालावधी असल्यामुळे राजकीय पातळीवर सध्या शांतता दिसून येत आहे.