नंदुरबार - 31 मे हा जागतिक तंबाखू विरोधी दिन म्हणून साजरा केला जातो. मात्र नंदुरबार शहरासह तळोदा तालुक्यात प्रतिबंधित गुटखा आणि तंबाखूजन्य पदार्थांची सर्रास विक्री होत आहे.
प्रत्येक शासकीय कार्यालयात तंबाखूजन्य पदार्थ सेवन करण्यास सक्त मनाई आहे. 'थुंकू नका' थुंकताना अढल्यास कायदेशीर कारवाई केली जाईल, असे फलकही कार्यालयात लावण्यात आले आहे. तरीही अनेक शासकीय कार्यालयात अनेक जण गुटख्याचे सेवन करून येतात, त्यामुळे कार्यालयाच्या भिंती पिचकाऱयांनी चांगल्याच रंगलेल्या असल्याचे चित्र येथे पाहायला मिळत आहे.
शासकीय कार्यालयात गुटखा व तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन करणाऱ्यांवर आणि या पदार्थांची विक्री करणाऱ्यांवर कारवाई करण्याची आवश्यकता आहे. मात्र प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष असल्याचे पाहायला मिळत आहे.