ETV Bharat / state

अडीच लाखांचा अवैध लाकूडसाठा जप्त; नंदुरबार-नवापूर वनविभागाची दोघांवर कारवाई - नंदुरबार-नवापूर वनविभाग

नवापूर तालुक्यातील जामतलाव येथील महसूल हद्दीतील खाजगी क्षेत्रातून जवळपास अडीच लाखांचा लाकूडसाठा जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई नंदुरबार-नवापूर वनविभागाने केली असून याप्रकरणी २ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

nandurbar
अडीच लाखांचा अवैध लाकूडसाठा जप्त
author img

By

Published : Jan 2, 2020, 10:12 AM IST

नंदुरबार - अवैधरीत्या जमा करून ठेवलेला खैर जातीचा लाकूडसाठा नंदुरबार-नवापूर वनविभागाने जप्त केला आहे. हा लाकूडसाठा २ लाख ५० हजार रुपये किमतीचा असून तालुक्यातील जामतलाव येथून ताब्यात घेतला. तसेच, येथून दोघांना ताब्यात घेऊन त्यांच्याविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. परेश सुरेश गावीत (रा. जामतलाव), अनिल बामण्या गावीत (रा. विसरवाडी) अशी या दोघांची नावे आहे आहेत. तर, या कारवाईमुळे लाकूड तस्करांमध्ये सध्या खळबळ उडाली आहे.

नवापूर तालुक्यातील जामतलाव येथील महसूल हद्दीतील खाजगी क्षेत्रात अवैध लाकूडसाठा असल्याची माहिती नंदुरबारचे सहाय्यक वनरक्षक गणेश रणदिवे व नवापूर वनक्षेत्रपाल प्रथमेश हाडपे यांना मिळाली. या माहितीच्या आधारे त्यांनी पथकासह जाऊन जामतलाव शिवारातील खाजगी क्षेत्रात छापा टाकला. यावेळी अंदाजे २ लाख ५० हजार रुपये किमतीचा खैर प्रजातीचा संपूर्ण साल काढलेला लाकूडसाठा मिळून आला. यावेळी सदर लाकूडसाठा पथकाने जप्त करुन वाहनाने नवापूर येथील शासकीय विक्री आगारात जमा केला. याबाबत जामतलाव क्षेत्राचे वनरक्षक यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार परेश गावीत आणि अनिल गावीत या दोघांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा - स्वतःवर गोळी झाडून एकाची आत्महत्या, नंदुरबारातील घटना

ही कारवाई नंदुरबारचे सहाय्यक वनरक्षक गणेश रणदिवे, नवापूरचे वनक्षेत्रपाल प्रथमेश हाडपे, वनपाल डी.के.जाधव, वनरक्षक एल.एस.पवार, डी.डी.पाटील, एस.डी.बडगुजर, आर.के.पावरा, एस.बी.गायकवाड, एस.पी.पदमोर, के.एन.वसावे, वाहनचालक भगवान साळवे, वॉचमन यांच्या पथकाने केली. या प्रकरणाचा पुढील तपास उपवनरक्षक नंदुरबार वनविभाग शहादा, उपवनरक्षक दक्षता पथक धुळे, सहाय्यक वनरक्षक (प्रादेशिक व वन्यजीव) नंदुरबार यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. खाजगी महसूल व जमिनीवरील शेतकर्‍यांचा खैर, साग, हलगु, सिसम आदी झाडांची वृक्षतोड करुन लाकुड तस्करी होत असल्यास माहिती देण्याचे आवाहन सहाय्यक वनरक्षक गणेश रणदिवे यांनी केले आहे.

हेही वाचा - 700 विद्यार्थ्यांनी सूर्य नमस्कार घालून केले नवीन वर्षाचे स्वागत

Intro:नंदुरबार - अवैधरित्या असलेला खैर जातीचा लाकुडसाठा जप्त केल्याची कारवाई नवापूर वनविभागाने केली आहे. तालुक्यातील जामतलाव येथुन 2 लाख 50 हजार रुपये किंमतीचा लाकुडसाठा जप्त करुन दोघांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईमुळे लाकुड तस्करांमध्ये खळबळ उडाली आहे.Body:नवापूर तालुक्यातील जामतलाव येथील महसूल हद्दीतील खाजगी क्षेत्रात अवैध लाकुडसाठा असल्याची माहिती नंदुरबारचे सहाय्यक वनरक्षक गणेश रणदिवे व नवापूर वनक्षेत्रपाल प्रथमेश हाडपे यांना मिळाली. या माहितीच्या आधारे त्यांनी पथकासह जावुन जामतलाव शिवारातील खाजगी क्षेत्रात धाड टाकली. यावेळी अंदाजे 2 लाख 50 हजार रुपये किंमतीचा खैर प्रजातीचा संपूर्ण साल काढलेला लाकुडसाठा मिळुन आला. यावेळी सदर लाकुडसाठा पथकाने जप्त करुन वाहनाने नवापूर येथील शासकीय विक्री आगारात जमा केला. याबाबत जामतलाव क्षेत्राचे वनरक्षक यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार परेश सुरेश गावीत (रा.जामतलाव), अनिल बामण्या गावीत (रा.विसरवाडी) या दोघांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई नंदुरबारचे सहाय्यक वनरक्षक गणेश रणदिवे, नवापूरचे वनक्षेत्रपाल प्रथमेश हाडपे, वनपाल डी.के.जाधव, वनरक्षक एल.एस.पवार, डी.डी.पाटील, एस.डी.बडगुजर, आर.के.पावरा, एस.बी.गायकवाड, एस.पी.पदमोर, के.एन.वसावे, वाहनचालक भगवान साळवे, वॉचमन यांच्या पथकाने केली. या प्रकरणाचा पुढील तपास उपवनरक्षक नंदुरबार वनविभाग शहादा, उपवनरक्षक दक्षता पथक धुळे, सहाय्यक वनरक्षक (प्रादेशिक व वन्यजीव) नंदुरबार यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु आहे. खाजगी महसूल व जमिनीवरील शेतकर्‍यांचा खैर, साग, हलगु, सिसम आदी झाडांची वृक्षतोड करुन लाकुड तस्करी होत असल्यास माहिती देण्याचे आवाहन सहाय्यक वनरक्षक गणेश रणदिवे यांनी केले आहे. Conclusion:नंदुरबार
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.