ETV Bharat / state

Woman Killed By Leopard : जेवण करीत असलेल्या महिलेला घरातून बिबट्याने फरफटत नेऊन केले ठार - नंदुरबारमध्ये बिबट्या

अक्कलकुवा तालुक्यातील डाबचा मालीआंबा येथे मोगराबाई रुमा तडवी या महिलेला बिबट्याने फरफटत नेऊन ठार केल्याची हृदयद्रावक घटना घडली (woman killed by leopard in Nandurbar) आहे. या घटनेमुळे परिसरात भीतीयुक्त वातावरण पसरले आहे.

Woman Killed By Leopard
अंधारात बिबट्याने केले महिलेला फस्त
author img

By

Published : Nov 24, 2022, 10:59 AM IST

नंदुरबार : अक्कलकुवा तालुक्यातील डाबचा मालीआंबा येथे मोगराबाई रुमा तडवी या महिलेला बिबट्याने फरफटत नेऊन ठार केल्याची हृदयद्रावक घटना घडली (woman killed by leopard in Nandurbar) आहे. या घटनेमुळे परिसरात भीतीयुक्त वातावरण पसरले आहे. या परिसरात असणाऱ्या हिंस्त्र प्राण्यांचा वन विभागाने बंदोबस्त करण्याची मागणी करण्यात आली आहे.

हल्ला चढवला : रात्री नऊ वाजेच्या दरम्यान मोगराबाई रुमा तडवी (वय 55) या मालीआंबा येथे आपल्या राहत्या घराच्या अंगणात जेवण करीत असतांना बिबट्याने त्यांच्यावर हल्ला चढवून फरफटत नेले. यावेळी घरात कोणीच नसल्याने असहाय झालेल्या मोगराबाई तडवी यांना बिबट्याने घरापासून सुमारे वीस ते पंचवीस मीटर अंतरावर नेऊन शरीर छिन्नविच्छिन्न (Woman Killed By Leopard) केले.

बिबट्या मृतदेहाचे लचके तोडताना : रात्री मयत मोगराबाई रुमा तडवी यांचे पती रुमा तडवी हे घरी आले असता त्यांनी आजूबाजूला मोगराबाई यांना आवाज दिला. मात्र घराच्या आजूबाजूला किर्र अंधार असल्या कारणाने व त्यांनी बॅटरीच्या सह्याने मोगराबाई यांचा शोध घेतला. मात्र त्या दिसुन आल्या नाहीत. त्यामुळे रात्री पुन्हा तीन वाजेच्या सुमारास घराच्या आजूबाजूला मोगराबाई यांना आवाज दिला. मात्र तरी देखील त्या मिळून आल्या नाहीत. म्हणून सकाळी सहा वाजेला उठल्यानंतर घराच्या बाहेर पडल्यानंतर रुमा तडवी यांना घरापासूनच 20 ते 25 मीटर अंतरावरील टेकड्यावर मोगराबाई तडवी यांचा छिन्न विच्छिन्न झालेला मृतदेह व मृतदेहा शेजारी बिबट्या मृतदेहाचे लचके तोडताना (woman killed in Nandurbar) दिसला.

महिलेला बिबट्याने फरफटत नेऊन ठार केल्याची हृदयद्रावक घटना

मृतदेहाचे विच्छेदन : त्यामुळे त्यांनी आवाज देऊ आजूबाजूच्या लोकांना घटना सांगितली त्यानंतर सदर घटनेची माहिती डाबचे सरपंच पोलीस प्रशासन व वन विभागाला देण्यात आली. त्यानुसार पोलीस व वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी त घटनास्थळाची पाहणी करुन घटनेचा पंचनामा केला. तर वैद्यकीय अधिकाऱ्यांनी जागेवर मृतदेहाचे विच्छेदन केले. मृत मोगराबाई तळवी यांच्या घरा जवळच्या परिसरात जंगल आहे. त्यामुळे या परिसरात हिंस्त्र प्राण्यांचा वावर आहे. वनविभागाने या हिस्त्र प्राण्यांचा त्वरित बंदोबस्त करावा, अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली (leopard in Nandurbar) आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.